एक्स्प्लोर

Mumbai -Nashik Highway: विकेंडमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा तर प्रवाशांचे देखील हाल

Mumbai -Nashik Highway: मुंबई नाशिक महामार्गावर वासिंद जवळ वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तर दोन ते तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai -Nashik Highway:  सध्या सुरु असलेल्या पावसामुळे आणि आलेल्या विकेंडमुळे प्रवाशांची फिरायाला जाण्याची लगबग सुरु आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई - नाशिक (Mumbai -Nashik Highway ) महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. मुंबई नाशिक महामर्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरात ही वाहतूक कोंडी झाली होती. परंतु तब्बल पाच तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.  या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या जवळपास दोन ते तीन किमी लांब रांगा लागल्या होत्या.

मागील तीन ते चार तासापासून सुरु असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने अडकली होती. तर यामुळे प्रवशांना देखील त्रास होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्या होत्या. वासिंद येथे सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं म्हटलं जात आहे. तर नागरिकांना पर्यायी रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे. 

ठाणे शहरातही मोठी वाहतूक कोंडी 

ठाणे शहरात दररोज वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळते. आज शनिवार (1 जुलै) रोजी  दुपारी मोठ्या प्रमाणात  ठाणे शहरात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. ही वाहतूक कोंडी ठाण्याच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर झाली होती. यामध्ये मुंबई- नाशिक महामार्ग ते भिवंडी-बायपास महामार्गवर शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या चाकारमान्यांना देखील या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. 

चाकरमान्यांना ठाण्यातील कळवा-खारेगाव टोल नाक्यापासून ते भिवंडी बायपासपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास झाला. मुंबई नाशिक महामार्गावरील युद्ध पातळीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामकाजांमुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच त्रास नागरिकांना देखील झाला. तर या वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याची मागणी यावेळी नागरिकांना केली आहे. 

सध्या सुरु असलेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांचा सुटका कधी होणार हा देखील सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच रस्त्यांवर सुरु असलेल्या कामांमुळे आणि खड्ड्यांच्या साम्रांज्यांमुळे नागरिक हैराण झाल्याचं देखील म्हटलं जात आहे. राज्यात सध्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. 

हे ही वाचा :

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शोधलं, 3 महिन्याचे संशोधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaKurla Bus Accident : आईचा मृतदेह आणण्यासाठी  ॲम्ब्युलन्ससाठी पैसे मागितलेKurla Bus Accident : अपघातात आईचा जीव गेला; मुलीची उद्विग्न प्रतिक्रियाAjit Pawar Meet Amit Shah : अमित शाहांशी ऊसाच्या प्रश्नावर चर्चेसाठी आलो - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले नाही, आयजी शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले..
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Pushpa 2 Actress Sreeleela : पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
पुष्पा 2 मधील श्रीलीला वयाच्या 21 व्या वर्षी आई झाली, पण अजूनही लग्न नाही; नेमकं कारण काय?
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Embed widget