एक्स्प्लोर

Thane Ring Metro: ठाण्यात रिंग मेट्रो सुरू होणार; 22 स्थानकं, 29 किमीचा रूट, कसा असणार मार्ग? जाणून घ्या सविस्तर

Thane Ring Metro: मेट्रोच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध भागांतील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

Thane Ring Metro: ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. ठाण्यातील दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला “ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प” (Thane Ring Metro Project) आता प्रत्यक्षात आकार घेणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या मेट्रोच्या बांधकामाला अधिकृत सुरुवात होणार असून, या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jam) मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे.

या मेट्रोच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. ठाणे हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर असून, येथील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून हा रिंग मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे.

Thane Ring Metro: 29 किमी लांबीचा मेट्रो कॉरिडॉर

या प्रकल्पाअंतर्गत एकूण 29 किलोमीटर लांबीचा मेट्रो कॉरिडॉर उभारला जाणार आहे. हा मार्ग वागळे इस्टेट, मानपाडा, बाळकुम आणि ठाणे जंक्शन अशा ठाण्यातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागांना जोडेल. या भागांना मेट्रोने जोडल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल तसेच शहरातील रस्त्यांवरील ताण कमी होईल.

Thane Ring Metro: 12,200 कोटी रुपयांचा खर्च

केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, एकूण अंदाजे 12,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. हा मार्ग उल्हास नदीपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत विस्तारित असणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही मेट्रो लाईन 2029 पर्यंत पूर्ण होऊन कार्यान्वित होईल आणि त्या वेळेस दररोज सुमारे 6.47 लाख प्रवासी या मेट्रो सेवांचा लाभ घेतील. पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Thane Ring Metro: एकूण 22 स्थानकं, त्यापैकी दोन भूमिगत

ठाणे रिंग मेट्रो मार्गावर एकूण 22 स्थानकं प्रस्तावित आहेत. त्यापैकी 20 स्थानकं उन्नत (एलिवेटेड) तर 2 स्थानकं भूमिगत (अंडरग्राऊंड) असतील.

Thane Ring Metro: मेट्रो मार्गावरील स्थानकांची यादी 

ठाणे जंक्शन, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, नवीन ठाणे, गांधी नगर, नीळकंठ टर्मिनल, रैला देवी, शिवाई नगर, काशिनाथ घाणेकर थिएटर, मानपाडा, विजय नगरी, वाघबिळ, डोंगरीपाडा, मनोरमानगर, पाटीलपाडा, आझादनगर बस डेपो, वॉटर फ्रंट, बाळकुम नाका, शिवाजी चौक, राबोडी, कोलशेत इंडस्ट्रिअल एरिया आणि बाळकुमपाडा.

या पैकी ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे ही दोन स्थानकं भूमिगत असतील, तर उर्वरित 20 स्थानकं उन्नत स्वरूपात उभारली जातील.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Thane Metro : मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ, 35 KM लांबी, ठाणेकरांचा प्रवास सुसज्ज करणारी मेट्रो कशी आहे, स्टेशन किती?

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi FDA Action: गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई
लोकल प्रवाशांच्या समस्यांवर रवींद्र चव्हाण 'अ‍ॅक्शन मोड'वर, DRM सोबत महत्त्वाची बैठक
लोकल प्रवाशांच्या समस्यांवर रवींद्र चव्हाण 'अ‍ॅक्शन मोड'वर, DRM सोबत महत्त्वाची बैठक
Mira Bhayander Municipal Corporation Priyanka Rajput: पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो कार जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget