Uddhav Thackeray Mumbra Visit Live : खरा बुलडोजर काय असतो ते दाखवायला आलो आहे, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

ठाण्यातल्या मुंब्य्रातील (Thane Mumbra) शिवसेनेच्या शाखेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुंब्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Nov 2023 06:25 PM
खरा बुलडोजर काय असतो ते दाखवायला आलो आहे, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

खरा बुलडोजर काय असतो ते दाखवायला आलो आहे, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : उद्धव ठाकरे बॅरिकेट्स जवळ, नेत्यांशी केली बातचीत

 Uddhav Thackeray Mumbra Visit Live : उद्धव ठाकरे बॅरिकेट्स जवळ, नेत्यांशी केली बातचीत

अजान सुरु होताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी थांबली.

मुंब्र्यात अजान सुरु होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी थांबवण्यात आली. दरम्यान अजान सुरु असल्यामुळे परिसरात शांतता पाहायला मिळत आहे. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : शाखेपाशी न जाण्याचं पोलिसांचं उद्धव ठाकरेंना आवाहन

Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  मुंब्र्यातील ज्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत, त्या शाखेजवळ न जाण्याचं आवाहन त्यांना पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अजूनही गाडीतच बसून आहेत. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : उद्धव ठाकरे मुंब्र्यात, पोलिसांनी ताफा वळवल्याने राडा, जितेंद्र आव्हाड भडकले

 Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुंब्र्यातील शाखेच्या (Mumbra Shivsena Shakha) भेटीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचं दिसून येतंय. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून त्यामुळे एकच गोंधळ झाल्याचं दिसून आलं. तसेच यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : उद्धव ठाकरेंचा ताफा शाखेपाशी दाखल

 Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  उद्धव ठाकरे हे मुंब्र्यातील शाखेजवळ दाखल झाले आहेत. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मुंब्र्यात दाखल झाले असून ठाकरे गटाकडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : उद्धव ठाकरे मुंब्र्यात दाखल

Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ताफा दाखल झाला आहे. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : ठाकरेंच्या समर्थनार्थ जाणाऱ्या कल्याणच्या कार्यकर्त्यांना स्टेशनवरूनच घेतलं ताब्यात

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी कल्याणवरून मुंब्र्याला निघालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना कल्याण महात्मा पोलिसांनी घेतले ताब्यात.


कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून रेल्वेचा प्रवास करत मुंब्रात जाण्यापूर्वी  कल्याण स्टेशन परिसरातून महात्मा फुले पोलिसांनी घेतले ताब्यात. 


सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून महात्मा फुले पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहेत.


कल्याण पूर्वेतील शिवसैनिकांना कोळशेवाडी पोलिसांनी नोटीसा धाडून प्रतिबंधक कारवाई करत पोलिसांनी मुंब्राकडे जाण्यास कार्यकर्त्यांना रोखले. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : ठाण्याच्या वेशीवर उद्धव ठाकरेंचं स्वागत

Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  मुंब्राच्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले असून ते आनंदनगरच्या टोलनाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : ठाण्याच्या वेशीवर उद्धव ठाकरेंचं स्वागत

Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  मुंब्राच्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले असून ते आनंदनगरच्या टोलनाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live : ठाण्याच्या वेशीवर उद्धव ठाकरेंचं स्वागत

Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  मुंब्राच्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झाले असून ते आनंदनगरच्या टोलनाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

Uddhav Thackeray Mumbra Visit Live :  मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांना अडवणार नाही, पोलिसांनी बजावलेली 144 ची नोटीस मागे घेतली 

मुंब्र्यात शिवसेना शिंदे गटाने जमीनदोस्त केलेल्या शाखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भेट देणार असून ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी बजावलेली 144 ची नोटीस मागे घेण्यात आली असून त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी भेट देण्यास अडवण्यात येणार नाही. 

Vijay Wadettiwar on Mumbtra Dispute : हे सरकार घाबरल्याचे हे लक्षण - विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar on Mumbtra Dispute : सरकार घाबरल्याचे हे लक्षण आहे, शासकीय यंत्रणेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग करणे सुरू झाला आहे, हेच मुंब्य्राच्या घटनेवरून सिद्ध झाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्यांना स्वतःच्या विचारापासून थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटने आहे आणि ते काम राज्यात सुरू झाला की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, असंह वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Mumbta Visit Police Meeting : उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची बैठक

सर्व मोठे पोलीस अधिकारी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये जमले आहेत. पोलिस आयुक्त पुन्हा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आले असून आता बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा दौऱ्यासाठी पोलीस बंदोबस्ताबाबत बैठक सुरु आहे.

Uddhav Thackeray Update : उद्धव ठाकरे यांचं जेसीबीच्या सहाय्याने स्वागत

जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे यांचं जेसीबीच्या सहाय्याने मुंब्रा वेशीवर स्वागत करणार आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं स्वागत करू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कळवा वरिष्ट पोलीस निरीक्षक कन्हैय्यालाल थोरात यांनी म्हटलं आहे.

Sharad Koli: मुख्यमंत्री शिंदेंच्या सांगण्यावरुन भाडोत्री गुंडांचं कृत्य : शरद कोळी

Sharad Koli: ठाण्यातील मुंब्र्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. गद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुन भाडोत्री गुंडांनी हे कृत्य केलंय. बाळासाहेबांचे नाव घेऊन मोठे झालात आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेची शाखा पाडली. २०२४ मध्ये हेच शिवसैनिक तुम्हाला पुन्हा रिक्षा चालवायला लावल्याशिवाय सोडणार नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केलीय. 

Thane News:  मुंब्य्रात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीचे आदेश

Thane News:  मुंब्र्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमावबंदीची नोटीस दिली आहे.  यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रॅली न काढणे, सभा न घेणे, आंदोलन न करणे अशा सर्वच गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.  

Mumbra Banner:  मुंब्रा शाखेबाहेर दोन्ही गटाकडून बॅनरबाजी

Mumbra Banner:  ठाण्यातील मुंब्रा शाखेबाहेर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.  ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर अज्ञातांनी फाडल्यानंतर दोन्ही गटांनी परत बॅनर लावले आहे. 

पार्श्वभूमी

ठाणे :  ठाण्यातल्या मुंब्य्रातील (Thane Mumbra) शिवसेनेच्या शाखेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मुंब्रातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज उद्धव ठाकरे भेट मुंब्य्रातील  शाखेला भेट देणार असून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी संजय राऊतही उपस्थित असतील. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शिवाय दौऱ्यावर ड्रोनद्वारे पोलिस नजर ठेवणार आहेत. दुसरीकडे शाखा परिसरात 100 मीटरपर्यंत नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी आहे. शिवाय दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यात आल्यात. शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी बुलडोजर फिरवलेल्या शाखेला  उद्धव ठाकरे हे स्वतः सायंकाळी भेट देणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.