मुंबई : राज्यात हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज लक्षात घेता, काही जिल्ह्यात 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, आज मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस झाला. त्याच पार्श्वभूमीवर उद्या 20 ऑगस्ट रोजीही अतिवृष्टीचा इशारा पाहता ठाणे, पालघर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा पाहता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातील तेथील परिस्थिती पाहून शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय घेण्यात येईल. मुंबईसह महाराष्ट्रात आज पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली होती. तर, मुंबईत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमंडली होती. चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. दरम्यान, उद्याही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाण्यासह रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी, संगमेश्वरमधील शास्त्री, लांजामधील काजळी आणि राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या बुधवार 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी हा आदेश काढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या 20 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या बुधवार 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातही शाळांना सुट्टी जाहीर
जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे परिपत्रक जारी केले आहे.
सातार जिल्ह्यातही शाळांना सुट्टी
सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 1282 प्राथमिक शाळांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून रेड अलर्ट देण्यात आला होता. डोंगर माथ्यावरील भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पाटण,जावली, महाबळेश्वर, वाई,सातारा आणि कराड तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. तर, सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 1282 प्राथमिक शाळांना उद्या 20 ऑगस्ट रोजीसुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तर माध्यमिक शाळांना पावसानुसार शाळेतील शिक्षकांनी निर्णय घ्यावा, असे शिक्षणविभागाचे आदेश आहेत. दरम्यान,मुसळधार पडत असलेल्या पावसाचा परिणाम झाला असून मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील अनेक नदी नाल्यांना महापूर आला आहे. अनेक भागांमध्ये गावांचे संपर्क तुटले आहेत. आणखी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता घेत शाळा प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस आयेशा मुसा नायकवाडी यांनी दिली आहे.
सांगलीतील 4 तालुक्यात सुट्टीचे आदेश
सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हे आदेश दिले आहेत. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामधील तसेच मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवस सुट्टीचे आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस तसेच कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत होणारी वाढ, कोयना व वारणा धरणांचा विसर्ग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता शाळांना सुट्टीचे आदेश आहेत.
हेही वाचा
मोनोरेलमध्ये 200 प्रवासी उंचावरच अडकले, श्वास गुदमरल्याने काच फोडली; बाेहर काढण्यासाठी 3 क्रेन