मोनोरेलमध्ये 200 प्रवासी उंचावरच अडकले, श्वास गुदमरल्याने काच फोडली; बाहेर काढण्यासाठी 3 क्रेन

मुंबईत एकीकडे पावसामुळे सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडली असून लोकल, हवाई वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे.

Mumbai monorail passenger trap

1/10
मुंबईत एकीकडे पावसामुळे सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडली असून लोकल, हवाई वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे.
2/10
मुंबईतील मोनोरेल वाहतुकीवर देखील मुंबईत पावासाचा फटका बसला असून 200 प्रवाशांनी भरलेली मोनोरेल चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान उंचावरच अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
3/10
मोनोरेल अडकल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून 3 क्रेन घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ट्रेनमधील प्रवाशांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहेत.
4/10
अग्निशमन दलाचे 20 ते 25 जवान घटनास्थळी दाखल झाले असून मोनो रेल बंद पडल्याची माहिती मिळताच आवश्यक ती यंत्रणा कामाला लावली असल्याचंही आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
5/10
सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेल बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला.
6/10
मुंबई अग्निशमन दलाने त्याची तातडीने दखल घेत घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे. आत्तापर्यंत 10 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.
7/10
चेंबूर ते भक्ती पार्क धावत असताना मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती अचानक बंद पडली. त्यामुळे आतील एसी बंद पडला. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
8/10
एक तासापासून प्रवासी उंचावरच अडकून पडल्याने भयभीत झाले होते, तसेच आतमध्ये गुदमरत असल्याने एका प्रवाशाने मोनो रेलची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला
9/10
महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
10/10
दरम्यान, सर्व प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे, कुणीही घाबरु नये, अर्धा तासात सर्व प्रवासी बाहेर येतील अशी माहिती भूषण गगराणी यांनी एबीपी माझाशी दिली.
Sponsored Links by Taboola