ठाणे: ठाण्यातील (Thane Crime News) चितळसर-मानपाडा येथे एका वृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपींचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीसांना मिळालेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन या आरोपींचा शोध सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठाण्यातील चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीतील मानपाडा परिसरामध्ये असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीत 14 व्या मजल्यावर हे दामप्त्य राहत होते समशेर बहाद्दुर सिंग (68) आणि मीना समशेर सिंग (65) अशी मृत ज्येष्ठ दाम्पत्याची नावे आहेत. त्यांचा मुलगा सुधीर समशेर सिंग हा अंबरनाथ म येथे राहात होता. मृत मिना समशेर सिंग, या दुधाचा व्यवसाय करत होत्या तर समशेर सिंग हे सुरक्षा राक्षकांचे काम करत होते. गुरुवारी दोघाचे मृतदेह आढळल्याने चितळसर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांच्या मानेवर संशयास्पद खुणा आढळल्या आहेत, त्यामुळे खूनाची शक्यता नाकरता येत नाही.
आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल
मुलगा सुधीर रात्री गुरुवारी रात्री आई वडिलांना भेटण्यासाठी आला. घरी गेल्यानंतर आई-वडिलांचा मृतदेह आढळून आला. याबाबत चितळसर पोलीस ठाण्यात सुधीर सिंग यांनी तक्रार नोंदविली. गुरुवारी दोघाचे मृतदेह आढळल्याने चितळसर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवले. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झासेसे नाही. . चितळसर पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे चितळसर-मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
या प्रकरणानंतर महानगरांमध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आजचा नाही तर हा पूर्वीपासून आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही मदत घेत आहे. दरम्यान घरात एकटे राहणाऱ्या वृद्धांनी घराजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात माहिती दिली असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
हे ही वाचा :