नागपूर :  नागपुरातील

  (Nagpur) वारंगणांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गंगा जमुना (Ganga Jamuna) वस्तीतील कुंटणखाण्यात पोलिसांनी छापा टाकत 31 पीडित महिलांची सुटका केली आहे. लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झोन 3 मधील सर्व पोलीस स्टेशन मिळून आज ही संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. अचानक केलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. या कारवाईत देहव्यापार करणाऱ्या काही महिलांसह इतर ग्राहकांना देखील ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक अल्पवयीन मुलींचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे. मात्र वैद्यकीय तपासनांतर या बाबत सुनिश्चितता दिली जाईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


31 पीडित महिलांची सुटका केली 


नागपूरच्या मध्यस्थानी वसलेल्या या वस्तीत वरकरणी बघितले तर इतर कोणत्याही सामान्य वस्ती सारखी ही वस्ती दिसत असली तरी,  येथे असलेल्या कुंटणखाण्यात मोठ्या प्रमाणात देहव्यापर केला जातो. केवळ नागपूर, विदर्भ नव्हे तर लगतच्या राज्यातून देखील या ठिकाणी लोकांची रेलचेल असल्याचे चित्र बघायला मिळतं. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच या कुप्रसिद्ध वस्तीत देहविक्रयावर बंदी घातली असून त्यासाठी संपूर्ण कॅम्पसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही परिसरामधील अनेक खोल्यांमध्ये छुप्या पद्धतीने देहविक्रय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरामधील अनेक कुंटणखान्यांमध्ये  मुलींना देहविक्री  करण्यासाठी भाग पाडले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज 5 जानेवारीला लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झोन 3 मधील सर्व पोलीस स्टेशन मिळून संयुक्तीत कारवाई केली. ज्यामध्ये काही देहविक्रयासाठी आणलेल्या 31 मुलींची सुटका करण्यात आली असून  या कारवाईदरम्यान इतर काही ग्राहकांनाही पकडण्यात आले आहे.


तीन कुंटणखाण्यात पोलिसांचा छापा


या कारवाई दरम्यान एकूण 3 कुंटणखाण्यात पोलिसांनी छापा घालत 3 वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. ज्यामध्ये पहिल्या कुंटणखाण्यातील गुन्ह्यात 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असून या कारवाई मध्ये एकूण 12 महिलांची सुटका करण्यात आलो आहे. तर दुसऱ्या कुंटणखाण्यात 2 महिला आणि 2 पुरुषांना आरोपी असून 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तिसऱ्या कुंटणखाण्यात 4 पुरुष आणि 2 महिला आरोपी असून एकूण 13 महिलांची सुटका करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या सर्व महिलांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्याना आधार आश्रमात ठेवण्याची तयारी सुरू आहे. त्याच प्रमाणे सर्व आरोपींच्या अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती लकडगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांनी दिली. 


हे ही वाचा :