एक्स्प्लोर

Thane : परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण, मनसे आक्रमक; अविनाश जाधवांनी ठाण्यातील मुजोर ओला-उबेर चालकांना चांगलंच चोपलं

Thane MNS Protest Updates : परप्रांतीय मुजोर चालकावर 307 चा गुन्हा दाखल करावा असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. या प्रकरणावरून दोन्ही शिवसेना आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. 

ठाणे : रस्त्यावर का थुंकला असं विचारल्यानंतर एका वृद्धाला परप्रांतिय चालकाने जबर मारहाण केल्याची घटना नुकतीच ठाण्यात घडली. त्यावर दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या चालकाला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता मनसेही त्यावरून आक्रमक झाली असून अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी अनेक मुजोर परप्रांतीय चालकांना चांगलाच चोप दिल्याचं दिसून आलं. तसेच वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतिय चालकावर एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याप्रमाणे 307 चा गुन्हा (Attempt to Murder) दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

परप्रांतीय चालकांकडून वृद्धाला मारहाण झाल्यानंतर ठाण्यातील व्हिवियाना मॉलच्या परिसरात मनसेचे नेते अविनाथ जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यावेळी त्या ठिकाणी अनेक ओला-उबेर चालकांनी रस्त्यावर त्यांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. यावेळी त्या मुजोर चालकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रसाद दिला. या मुजोर परप्रांतियांनी आपलं पोट भरावं आणि नीट जावं, इथे येऊन माज करू नये असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. 

Thane Assault Case : नेमकं काय घडलं? 

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ एक वृद्ध दाम्पत्य पायी जात असताना एक परप्रांतीय चालक रस्त्यावर थुंकला. याचा जाब ज्या वृद्ध व्यक्तीने विचारल्यानंतर त्या परप्रांतीय चालकाने त्या वृद्धाला मारहाण केली. परप्रांतीय चालकाने हातामध्ये दगड घेऊन त्या वृद्धाला मारहाण केली. यामध्ये तो वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतिय चालकाचा शोध घेऊन त्याला चांगलाच चोप दिला आणि त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन लावला आणि त्या मुजोर चालकावर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. 

Thane MNS Avinash Jadhav : अविनाश जाधवांकडून मुजोर चालकांना चोप

दरम्यान, या घटनेनंतर ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्हिवियाना मॉलचा परिसर गाठला आणि तिथल्या मुजोर चालकांना चांगलाच चोप दिला. या मॉलच्या समोर अनेक ओला उबेर चालकांनी त्यांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. त्यावेळी चौकशी केली असता त्या चालकांनी उद्धट उत्तर दिल्यानंतर अविनाश जाधवांनी त्यांना चांगलाच चोप दिला. 

ठाण्यातील या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, "परप्रांतिय चालकांनी नीट पोटापाण्याचा व्यवसाय करावा आणि नीट जावं. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली तर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. सरकारने जे काही आश्वासन दिलं आहे ते त्यांनी पाळावं. या मुजोर चालकांनी आमच्या लोकांना मारहाण केल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग आम्ही त्यांना मारताना का लाजायचं?"

तो परप्रांतीय व्यक्ती थुंकत होता म्हणून वृद्धाला ते पटले नाही. या किरकोळ कारणावरून त्या वयोवृद्धाला इतकी बेदम मारहाण केली. महाराष्ट्रात जर असे होत असेल तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असंही अविनाश जाधव म्हणाले. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget