Shrikant Shinde : कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, जाणून घ्या कोण आहेत श्रीकांत शिंदे?
खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे शिवसेनेकडून 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत.
ठाणे : शिवसेनेतील आमदारांच्या नंतर आता खासदारांनीही बंड केलं असून 12 खासदारांनी वेगळा गट तयार करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केलं आहे. यामध्ये कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी पुढाकार घेतल्याचं स्पष्ट झालं. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असून ते दोनवेळा लोकसभेवर निवडून आहेत.
खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती
खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत
शिक्षण : Orthopedic Surgeon
-2014- शिवसेनेमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
- 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार.
2014 मध्ये श्रीकांत शिंदे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे आणि मनसे उमेदवार राजू पाटील यांचे आव्हान होते .या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 4 लाख 40 हजार 892 मतं मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद परांजपे यांना आनंद परांजपे 1 लाख 90 हजार 143 मते मिळाली. मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना 1 लाख 22 हजार 349 मतं मिळाली होती. पहिल्यांदा लोकसभेच्या निवणुकीला सामोरे गेलेल्या श्रीकांत शिंदे यांचा 2 लाख 50 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता .
- 2019 च्या लोकसभा निडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 59 हजार 723 मतं मिळाली होती. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 2 लाख 15 हजार 380 मतं मिळाली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 3 लाख 44 हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. शिंदे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या लाईनचे काम मार्गी लावले. कल्याणमधील पत्री पुलाचे काम पूर्ण, डोंबिवलीमध्ये पासपोर्ट कार्यालय, उल्हासनगरमध्ये कामगारांसाठी अद्यावत रुग्णालय,अंबरनाथमध्ये शूटिंग रेंजची उभारणी, ठाकुर्ली पादचारी पूल, डोंबिवली कोपर पूल, कल्याण शील रोड रुंदीकरण व काँक्रीटीकरण, कल्याण डोंबिवलीमधील रिंग रोड, कोरोना काळात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये जंबो कोव्हिड सेंटर, कोपर रेल्वे स्थानकात होम प्लॉट फॉर्म सुरू.