कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) एका व्यक्तीने आधी त्याच्या बायको आणि मुलाची गळा दाबून हत्या (Murder) केली. त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. कल्याणमधील या घटनेमुळे एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या एक खेळणी व्यावसायिक असून त्याने याबाबत त्याच्या भावाला माहिती दिली. त्यानंतर हा व्यक्ती पसार झाला. या व्यावसायिकाने आपल्या सात वर्षाच्या मुलासह पत्नीची हत्या केली. दीपक गायकवाड असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं कल्याणमधील नानू वर्ल्ड हे खेळण्याचं दुकान असल्याची माहिती समोरआ आलीये. 


दीपकने मुलाची आणि पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. कल्याण पश्चिम भागामध्ये  रामबाग लेन नंबर तीन येथे दीपक आणि त्याचे कुटुंब वास्तव्यास होते. इथे तो त्याची पत्नी अश्विनी आणि मुलाग आदिराज यांच्यासोबत राहत होता. शनिवार 2 डिसेंबर रोजी त्याने त्याच्या भावाला फोन करुन माहिती दिली की, त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केलीये. तसेच स्वत: देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर यासंदर्भातील माहिती महात्मा फुले पोलीस स्थानकात देण्यात आली. 


पोलीस घटनास्थळी दाखल


या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलगा आणि आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पण या सगळ्यामध्ये दीपक हा फरार झाला. दीपकचे कल्याणमधील नानूस वर्ल्ड हे महागड्या खेळण्यांचे दुकान आहे. पण तरीही दीपकने हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. दरम्यान या प्रश्नांचा उलगडा हा दीपक सापडल्यानंतरच होईल. पण या घटनेमुळे कल्याण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. 


डोंबिवलीमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक 


डोंबिवली मध्ये शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के फायदा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. आरोपीने 150 हून अधिक लोकांना 4 कोटी 60 लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनय वरटी असे या आरोपीचे नाव असून शेअर मार्केटिंग साठी त्याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंग चे कार्यालय सुरू केले होते. जवळपास 150 हून अधिक नागरिकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मात्र गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या झेरॉक्स साठी तब्बल 42 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली. 


हेही वाचा :


पत्नीने चिकन न दिल्याने पतीने रागाच्या भरात लहान मुलीच्या डोक्यात घातली वीट, पुण्यातील पाषाण येथील घटना