पुणे : पुणे जिल्ह्यातील पाषाण (Pashan) येथे धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने घराशेजारी खेळत असलेल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेत लहान गंभीर जखमी झाली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पतीवर (Case Filed Against Husband) गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (27 नोव्हेंबर) रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
विकास राठोड असे आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होते. पत्नीने जेवणात चिकन न केल्याने चिडलेल्या पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली आणि तिला जखमी आहे. ही घटना पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी महिलेचेच्या नातेवाईकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विकास राठोडला सोमवारी रात्री पत्नीने जेवण दिले. परंतु जेवणात चिकन नसल्याने चिडून त्याने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारली. त्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहे. अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बंद घराला हेरून चोरी, साडे सतरा लाखाचा ऐवज केला लंपास
दिवाळी निमित्ताने अनेक जण घराबाहेर पडत असतात. अशावेळी बंद घरांना हेरून त्या घरांमध्ये घरफोडी सारख्या घटनांमध्ये वाढ होत होती. असाच पुण्यात गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरातील दिवाळीच्या सुट्टीत बाहेर गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचे टाळे तोडून घरात प्रवेश करून घराच्या कपाटातून सोन्या चांदीचे दागिने त्याचप्रमाणे रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दोन दिवसानंतर घरी आल्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली आणि तात्काळ त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घरात चोरी झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली तेव्हा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करु घेतला. त्याप्रमाणे पोलिसांनी चोरट्यांचा शोध देखील सुरु केला.
पुण्यात गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरातील एका सदनिकेतून चोरट्यांनी 17 लाख 45 हजार रुपये किमतीचे 45 तोळे सोने आणि हिऱ्याचे दागिने चोरुन नेले. याच परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून चोरट्यांनी 33 लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी चतु: शृंगी पोलिसांत तक्रार देण्यात आलीय.फिर्यादी 25 नोव्हेंबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या सदनिकेतील कपाटातून 85 तोळे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरुन नेले.दोन दिवसांनी फिर्यादी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत. दरम्यान, भोसलेनगर परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून चोरट्यांनी हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे 33 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :