Dombivli Crime : डोंबिवलीत (Dombivli Crime) एका आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ट्यूशन टिचरच्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार (Dombivli Crime) समोर आलाय. घरातील बेडरूममध्ये डांबून अत्याचार केल्याची घटना घडलीये. घडलेली घटना पीडित विद्यार्थिनीने नातेवाईकांना सांगितल्याने सर्व प्रकार उघडकीस आलाय़. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ट्युनश टिचर घरी नसताना भावाने केलं कृत्य
अधिकची माहिती अशी की, डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत होती. आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्यांच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येत होते. काल रात्री आठ वाजता पीडीत मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती. तेव्हा आरोपी वैभव याने पिडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूमच्या दरवाजाची कड़ी आतून लावून पिडीत मुलीसोबत जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटने बद्दल कुटुंबियांना सांगितले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी ताबडतोड आरोपीला अटक करून तपास सुरु केला आहे.
डोंबिवलीतील धक्कादायक घटना
आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
क्लास घेणाऱ्या शिक्षिकेच्या भावाने केला अत्याचार
आरोपी वैभव जितेंद्र सिंग या नराधमाला पोलिसांनी केली अटक
तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार आरे कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. तंत्रमंत्राच्या साहाय्याने पतीचा आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 37 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीने पीडित महिलेच्या 14 व 16 वर्षांच्या मुलींचाही विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. भोंदू बाबाच्या अत्याचाराला विरोध केल्यास कुटुंबियांना जादुटोनाच्या मदतीने जिवे मारण्याची धमकी भोंदूबाबने महिलेला दिली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Saif Ali Khan : पाठीतून पाणी लीक झालं, जखमेमुळे पॅरालाईजचा धोका, सैफवर 6 तास शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी धडकी भरवणारी माहिती सांगितली!