Dr. Nitin Dange on Saif Ali Khan, Mumbai  : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज (दि.16) मुंबईतील राहत्या घरी एका चोरट्याने हल्ला केला होता. त्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर एक सर्जरी करण्यात आली. दरम्यान सैफवर झालेल्या उपचारांबाबत डॉक्टर नितीन डांगे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

नितीन डांगे काय काय म्हणाले?

नितीन डांगे म्हणाले, सध्या सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आता काहीही प्रॉबलेम नाही. ऑबझर्वेशनसाठी आम्ही त्यांना आयसीयूमध्ये ठेवलेलं आहे. कारण बराच वेळ शस्त्रक्रिया चालली होती. साधारण आपण सकाळ सहा वाजता त्यांचं ऑपरेशन सुरु केलं होतं. 12 वाजेपर्यंत शस्त्रक्रिया चालली. पहिल्यांदा मनक्याचं ऑपरेशन केलं होतं. तिथे चाकूचा काही भाग आतमध्ये घुसला होता. चाकू डिपमध्ये गेल्याने मज्जातंतूच्या जवळपास इजा झाली होती. पाठितील जे पाणी असतं, ते लीक होतं होतं. तिथं आम्ही ऑपरेशन केलं. त्यांना सध्या काहीही प्रॉबलेम नाही. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्या सकाळी आम्ही त्यांना रुममध्ये शिफ्ट करणार आहोत. त्यानंतर लवकरात लवकर डिस्चार्ज करण्यात येईल. नशिबाने एक गोष्ट चांगली झाली आहे की, एवढं डॅमेज झालेलं असताना आणि वार झालेले असताना सुद्धा त्यांना पर्मनंट डॅमेज झालेलं नाही. परत ते लवकरात लवकर नॉर्मल लाईफमध्ये येतील, अशी अपेक्षा आहे. 

पुढे बोलताना नितीन डांगे म्हणाले,अडीच वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरी हल्ला झाला होता. अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्या शरिरावर छोट्या छोट्या जखमा होत्या. सर्वात गंभीर जी जखम झाली ती पाठित होती. त्यामुळे त्यांच्या पाठित जास्त दुखत होतं. त्यामुळे आम्ही आल्या आल्या त्यांचा सिटी स्कॅन केला. चाकूचा एक पार्ट त्यांच्या स्पायनल कॉर्डच्या जवळ घुसला होता. तो डीप होता, आणि त्यांच्या पाठित फार दुखत होतं. त्यामुळे आम्ही सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. 5 वाजता ऑपरेशनमध्ये शिफ्ट केलं ते तीन वाजता रुग्णालयात आले होते. चाकूचा तुटलेला भाग आम्ही ऑपरेशन करुन काढला. पाठिचं पाणी लीक होतं तिथ आम्ही टाके घेतले. हातावरील जखमी खोल होत्या..मानेवरही जखमा होत्या. तिथेही टाके घेण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

रुग्णालयात आले तेव्हा पूर्णपणे शुद्धीत होते. मार लागल्यामुळे जास्त चालू शकत नव्हते. मणक्यामध्ये मार लागला तरी नस डॅमेज नव्हते. आम्हाला काळजी होती की, त्यांना पॅरालिसिस व्हायला नको. ते सुरुवातीला घाबरले होते. काही मेजर जखमा होत्या. मोठी सर्जरी करायची म्हटल्यावर कोणालाही भीती वाटते. त्यावेळी त्यांना सर्व समजत होतं, असंही डांगे यांनी सांगितलं. 

Dr Nitin Dange on Saif Ali Khan : जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVE

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय