एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : राम काहीही खावो, पण तुम्ही मात्र शेX खाल्लं; देवेंद्र फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Devendra Fadanvis : येत्या 22 तारखेला असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजलं पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान झाला आहे असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 

ठाणे: ठाण्यातील एक शहाणा म्हणत होता की राम काय खात होते, त्यावर मी एवढंच सांगतो की राम काहीही खाऊ द्या, पण तुम्ही मात्र शेण खालं आहे अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका केली. तसेच ज्या लोकांना राम मंदिराला विरोध केला त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस हे ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. 

श्री राम हा बहुजनांचा होता, तो मांसाहारी होता असं वक्तव्य या आधी आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी यावर खेदही व्यक्त केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी आव्हाडांना टोला लगावला. 

राम मंदिर होणं ही अभिमानाची गोष्ट 

अयोध्येत राम मंदिर होत आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. ते म्हणाले की, 22 तारखेला असा उत्सव साजरा करा की दुनियेला समजलं पाहिजे अयोध्येचा राजा अयोध्येमध्ये पुन्हा विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमान निर्माण झाला. राम मंदीर होत आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बाबराने आपले राम मंदिर पाडले आणि बाबरी मशिद बांधली. सगळ्या लोकांना ही मशिद टोचत होती. 6 डिसेंबर रोजी ही बाबरी मशिद पाडली. मला आता आनंद होत आहे, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भव्य राम मंदिर  22 जानेवारी स्थापना होणार आहे. काही लोकांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यांनी सुप्रीम कोर्टात रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 

आमच्या महाराष्ट्रात काही लोक आम्हाला विचारत होते की मंदिर कधी बांधणार? आता आम्ही राम मंदिर बांधलं, पण आता ते अयोध्येला कसे येणार, कारण त्यांना लाज वाटते असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

कारसेवक हीच माझी पहिली ओळख

मी सुद्धा कारसेवक होतो, कारसेवक हीच माझी पहिली ओळख आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल त्यांनी विचारलं फडणवीस कारसेवक होते का?  हो मी वीस वर्षाचा होतो, त्यावेळी कारसेवक होतो. तुमचे तर वय होते, त्यावेळी तुम्ही वाघाचे फोटो काढत होता.  खरे कारसेवक तर अयोध्येत  लाठ्या खात होते, गोळ्या खात होते. उद्धव ठाकरे तुमचा एक नेता दाखवा, जो अयोध्येत कारसेवक होता. ज्या लोकांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्या मांडीला मंडी लावून बसला. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget