भिवंडी :  भिवंडीत (Bhiwandi News)  म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप (Ghee)  बनवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर लोकांच्या जिवाशी खेळ मांडणारा हा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आला आहे.या प्रकरणी भिवंडी महापालिका प्रशासनाकडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


म्हशीच्या चरबीपासून तयार करण्यात आलेल्या तुपाचा विविध खानावळी आणि हॉटेल्सना पुरवठा सुरू होता. भिवंडी महापालिका प्रशासनाला याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानं पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी आपत्कालीन विभागाच्या पथकासह या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात म्हशीच्या चरबीपासून बनवण्यात आलेल्या तुपाचे डबे आणि तूप बनवण्याच साहित्य जप्त करण्यात आलं.  पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.


मोठ्या प्रमाणावर बनावट तूप आणि साहित्य जप्त


भिवंडी  शहरातील इदगाह साल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात शहरातील खाण्यासाठी कापण्यात आलेल्या म्हशी रेड्याच्या चरबीपासून तूप बनविण्याचे काम सुरू होते. या बाबत  पालिका पर्यावरण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव,आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे यांनी पालिका पथकासह या ठिकाणी कारवाई केली.  घटनेच्या ठिकाणी आढळून आलेले तूप बनविण्याच्या भट्टीवरील कढई, बनावट तुपाचे डब्बे,कढई असे मोठे साहित्य जप्त केले आहे .या बाबत पालिका प्रशासना कडून स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


खरेदी करताना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन 


स्वस्त आणि भेसळयुक्त तुपामुळे नागरिकांचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता आगहे. त्यामुळे खात्रीच्या ठिकाणावरुन तूप किंवा अन्य पदार्थांची खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


अशी करा तक्रार ...


याबाबत प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.  ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करणाऱ्याविरुद्ध  तक्रार करावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.तूप, भेसळयुक्त गूळ आणि साखर वापरणाऱ्या गूळ उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येत आहे.  या सगळ्यांच्या विक्रीमुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं तातडीने करावाई करण्यात येत आहे.



हे ही वाचा :


Dead House Lizard Found In Bread : चहा-पाव, वडा पाव खाताना लक्ष असू द्या; नरम पावात आढळली मेलेली पाल; भिवंडीत खळबळ