एक्स्प्लोर

Badlapur Crime : माजी नगरसेवक हल्ल्याप्रकरणी एकाला बेड्या, मुख्य आरोपीचा शोध सुरु; अविनाश मोरेंवर पूर्ववैमनस्यातून हल्ला

Badlapur Crime : बदलापूरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत.

Badlapur Crime : बदलापूरमधील (Badlapur) शिवसेनेचे (Shiv Sena) माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अविनाश मोरे यांच्यावर मंगळवारी (20 सप्टेंबर) रात्री हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. विशाल आचार्य असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून अविनाश मोरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत.

ठोशाबुक्क्यांनी मारहाण, पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी
बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव आपटेवाडी परिसरातून इनोव्हा कारने त्यांच्या घरी जात होते. यावेळी महेंद्र उर्फ पप्पू बागुल आणि विशाल आचार्य या दोघांनी टोयोटा कोरोला गाडी मोरे यांच्या गाडीसमोर आडवी घातली. यानंतर पप्पू बागुलने मोरे यांच्याजवळ जात त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पिस्तुल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. 

एका आरोपीला बेड्या, 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अविनाश मोरे हल्ल्या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विशाल आचार्य याला त्याच्या गाडीसह ताब्यात घेतलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

पूर्ववैमनस्यातून अविनाश मोरे यांच्यावर हल्ला : पोलीस
या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू बागुल याने 2013 साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या आऊ मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. त्याच रागातून मोरे यांच्यावर नऊ वर्षांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. बदलापुरातील प्रामाणिक नेते आणि 'मास लीडर' अशी शरद म्हात्रे यांची ओळख आहे. जुलै 2013 मध्ये त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

मुख्य आरोपी सराईत गुंड
दरम्यान पप्पू बागुल हा सराईत गुंड असून त्याच्यावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी दोन पथकं रवाना केली आहेत. लवकरच त्याच्या मुसक्या आवळू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime News: धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! भिवंडीत जीन्स कारखान्यात कैचीने एकमेकांवर सपासप वार; कारखान्याबाहेरही रक्तरंजित राडा
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
डिलिमिटेशनला पाठिंबा म्हणजे संविधानाची मोठी हानी, पक्षाच्या भूमिकेलाच जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा विरोध, नताशा आव्हाडांची पोस्ट चर्चेत
डिलिमिटेशनला पाठिंबा म्हणजे संविधानाची मोठी हानी, पक्षाच्या भूमिकेलाच जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा विरोध, नताशा आव्हाडांची पोस्ट चर्चेत
Nala Sopara Chhath Puja : नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....
नालासोपाऱ्यात छठपूजेवरून तणाव; संतप्त महिलांनी नियम डावलून तलावाच्या प्रवेशद्वाराचं कुलूप तोडलं, अन्.....

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Embed widget