एक्स्प्लोर
यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या भेटीला
![यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या भेटीला Yu Yunicorn Flipkart Sale Tomorrow Price Specs Features Competition यू टेलिव्हेंचर्सचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या भेटीला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/06174015/yu-yunicorn-compressed-205x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्लीः यू टेलिव्हेंचर्स या कंपनीचा Yu Yunicorn हा फ्लॅगशिप स्मार्टफोन उद्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या बजेट स्मार्टफोनची किंमत केवळ 12 हजार 999 रुपये असून यू टेलिव्हेंचर्स कंपनीचा एवढ्या कमी किंमतीचा हा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. या फोनच्या किंमतीत एका महिन्यानंतर वाढ होणार असून 13 हजार 499 रुपये एवढी असणार आहे.
यू टेलिव्हेंचर्स कंपनीने यापूर्वी देखील Yu Yutopia हा फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत 24 हजार 999 रुपये होती. इतर स्मार्टफोनच्या स्पर्धेत या स्मार्टफोनला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे कंपनीने Yu Yunicorn हा मिडबजेट स्मार्टफोन आणला आहे.
Yu Yunicorn स्मार्टफोनचे खास फीचर्स:
- 5.5 इंच आकाराची मिराव्हिजन 2.0 ही एचडी स्क्रिन
- Yu Yunicorn फोन मेटल बॉडीमध्ये उपलब्ध असून यात नवे फीचर्सही देण्यात आले आहेत.
- मीडिया टेक हेलिओ P10 हे प्रोसेसर
- 4GB ची रॅम आणि 32GB स्टोअरेज
- Yu Yunicorn फोनचे दोन्हीही कॅमेरा याचे खास आकर्षण आहेत. 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
- 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)