एक्स्प्लोर
Advertisement
उबर कॅबचं ऑनलाईन बुकिंग, ड्रायव्हरचं लोकेशन अरबी समुद्रात
मुंबईच्या हुसैन शेख नावाच्या यूजरने ऑनलाईन उबर कॅब बुक केली. त्यानंतर त्याला उबरकडून कॅब ड्रायव्हर असलमच्या लोकेशनचा मेसेज आला. त्यात असलम यांचं लोकेशन चक्क अरबी समुद्रात दाखवत होतं.
मुंबई : सध्या गुगल मॅपमध्ये लोकेशनच्या तक्रारी कमी झालेल्या असल्या, तरी त्या पूर्णपणे संपल्या आहेत, असं काही नाही. कारण चुकीच्या नेव्हिगेशनमुळे अनेकांना ‘वईवरुन सातारा’ प्रवास करावा लागतो. जीपीएस बेस्ड कॅब सर्व्हिसवर काम करणाऱ्या असलम नावाच्या ड्रायव्हरबाबतही अशीच काहीशी घटना घडली.
मुंबईच्या हुसैन शेख नावाच्या यूजरने ऑनलाईन उबर कॅब बुक केली. त्यानंतर त्याला उबरकडून कॅब ड्रायव्हर असलमच्या लोकेशनचा मेसेज आला. त्यात असलम यांचं लोकेशन चक्क अरबी समुद्रात दाखवत होतं.
यानंतर हुसैन शेखने याचा स्क्रिन शॉट काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हुसैने याची फेसबुकवर खिल्ली उडवताना म्हटलंय की, “असलम भाई सबमरीनमधून येत आहेत.”
हुसैनची ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, फेसबुक यूजर्सकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तसेच हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement