एक्स्प्लोर

फेसबुकने घेतला तरुणीचा जीव

चेन्नई : तमिळनाडूतील सेलममध्ये फेसबुकमुळे एका २१ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला आहे. सेलममधील २१ वर्षीय विनुप्रियाचे फोटो काही अज्ञातांनी मॉर्फ्ड करून अश्लील फोटो बनवून फेसबुकवर अपलोड केले होते. याची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवूनही, कोणतीही कारवाई न झाल्याने विनुप्रियाने गळफास लावून आत्महत्या केली.   विनुप्रियाने आपली जीवन यात्रा संपवताना सुसाइड नोट लिहून ठेवली होते. यात तिने फेसबुकवरील अपलोड केलेले अश्लिल फोटो कुणालाही पाठवले नव्हते. मात्र याचा तिच्या आई-वडिलांना विश्वास नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे, म्हटले आहे. तसेच आपल्या पालकांच्या अविश्वासाप्रति तिने खेद व्यक्त केला आहे.   या घटनेनंतर विष्णूप्रियाच्या पालकांनी फेसबुकवरील फोटो प्रकरणावर कारवाई करण्यासाठी एका पोलीस आधिकाऱ्याने मोबाईल फोनची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने विनुप्रियाच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या दोन्ही अधिकऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.   गेल्या वर्षी विष्णूप्रियाने केमिस्ट्रीमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. विष्णूप्रियाच्याच नावाने काही अज्ञातांनी फेसबुक पेज बनवून तिचे अश्लिल मॉर्फ्ड फोटो अपलोड केले होते. यावर २३ जून रोजी सेलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून हे फोटो तत्काळ हटवण्याची मागणी केली होती. पण तसे न झाल्याने विष्णूप्रियाने आपली जीवन यात्रा संपवली.   या प्रकरणी पोलिसांनी हे फेसबुक पेज ब्लॉक केले असून विष्णूप्रियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच हे फेसबुक पेज बनवून फोटो अपलोड करणाऱ्यांची माहिती फेसबुक व्यवस्थापनाकडे मागितले असल्याचे सांगण्यात आले.   पण विष्णूप्रियाच्या कुटुंबियांनी कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

Embed widget