एक्स्प्लोर

शाओमीचं व्हॅलेंटाईन गिफ्ट, दोन स्मार्टफोन आणि टीव्ही लाँच

दोन्ही स्मार्टफोन आणि टीव्ही 22 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

नवी दिल्ली : शाओमीने व्हॅलेंटाईन डेचं खास गिफ्ट दिलं आहे. कंपनीने रेड मी नोट 5, रेड मी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन आणि Mi हा टीव्ही लाँच केला आहे. दोन्ही स्मार्टफोन आणि टीव्ही 22 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. शाओमीचं व्हॅलेंटाईन गिफ्ट, दोन स्मार्टफोन आणि टीव्ही लाँच रेड मी नोट 5 चे स्पेसिफिकेशन रेड मी नोट 5 हे गेल्या वर्षीच्या रेड मी नोट 5 चं नवं व्हर्जन आहे. यामध्ये 5.99 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि अँड्रॉईड नॉगट सिस्टम देण्यात आली आहे. या शिवाय 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, रोज गोल्ड आणि ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध होईल. रेडमी नोट 5 प्रोची किंमत रेड मी नोट 5 प्रोचा ग्लोबल लाँच आज दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. हा बजेट कॅमेरा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनचे 4GB रॅम आणि 6GB रॅम असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये, तर 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. शाओमीचं व्हॅलेंटाईन गिफ्ट, दोन स्मार्टफोन आणि टीव्ही लाँच रेडमी नोट 5 प्रोचे स्पेसिफिकेशन रेडमी नोट 5 प्रो या फोनमध्ये 5.9 इंच आकाराची स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 12MP+5MP ड्युअल रिअर कॅमेरा, ब्यूटीफाय 4.0, 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फ्रंट कॅमेऱ्यासाठी पोर्ट्रेट मोड, 64 GB इंटर्नल स्टोरेज आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. शाओमीचं व्हॅलेंटाईन गिफ्ट, दोन स्मार्टफोन आणि टीव्ही लाँच Mi TV शाओमीने भारतीय बाजारात पहिल्यांदाच स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. 22 फेब्रुवारीपासून हा टीव्ही ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता येईल. या टीव्हीची किंमत 39 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम टीव्ही असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 55 इंचच्या या टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 8GB इंटर्नल स्टोरेज आणि क्वाडकोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
Embed widget