एक्स्प्लोर
Advertisement
ट्रीपल कॅमेरा, 4 GB रॅम, शाओमीचा नवा फोन लाँच
नवी दिल्लीः शाओमीने मच अवेटेड स्मार्टफोन रेडमी नोट प्रो अखेर चीनमध्ये लाँच केला आहे. हेलिओ X20 आणि हेलिओ X25 या दोन व्हर्जनमध्ये हा फोन दोन व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 15 हजार आणि 20 हजार ठेवण्यात आली आहे.
तीन कॅमेरे असणारा शाओमीचा हा पहिलाच फोन आहे. या फोनमध्ये जबरदस्त क्वालिटीचे दोन रिअर तर एक फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे या फोनचा कॅमेराच खरं आकर्षण असणार आहे. भारतात हा फोन भारतात कधी येणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
रेडमी नोट प्रोचे फीचर्स
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- हेलिओ X20, 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज
- हेलिओ X25, 4 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- फिंगर प्रिंट सेन्सर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भविष्य
बॉलीवूड
क्राईम
Advertisement