एक्स्प्लोर
शाओमीचा नवा फोन लाँच, एका मिनिटात स्टॉक संपला
नवी दिल्ली : नुकताच लाँच झालेला रेडमी नोट 4 हा स्मार्टफोन शाओमीच्या वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी आजपासून उपलब्ध झाला आहे. मात्र हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होताच केवळ एका मिनिटात या फोनचा स्टॉक संपला. या फोनची पुढील विक्री 30 जानेवारीपासून सुरु करण्यात येईल.
शाओमीचा हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. 2GB रॅम / 32GB इंटर्नल स्टोरेज , 3GB रॅम / 32GB इंटर्नल स्टोरेज आणि 4GB रॅम / 64GB इंटर्नल स्टोरेज या व्हेरिंएट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 9 हजार 999, 10 हजार 999 आणि 12 हजार 999 रुपये आहे.
रेडमी नोट 4 चे फिचर्स :
अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीम, 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 2/3/4 GB रॅम व्हेरिएंट्स, 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रीन, रिअर 13 मेगापिक्सेल आणि रिअर 5 मेगापिक्सेल, 32 GB आणि 64 GB आणि 4100 mAh क्षमतेची बॅटरी असे फीचर्स या फोनमध्ये आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement