एक्स्प्लोर

मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये 'नॉर्वे' अव्वल!

गेल्या 13 महिन्यात मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे 11व्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर आलं आहे.

ओस्लो (नॉर्वे) : जगभरात इंटरनेट स्पीडची चाचणी करणारी एजन्सी ओक्लाच्या मते, जगात सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेटचा स्पीड नॉर्वे या देशात आहे. गेल्या 13 महिन्यात मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे 11व्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर आलं आहे. ओक्लानं इंटरनेटच्या स्पीड तपासणीसाठी 'स्पीडटेस्ट डॉट नेट' हे अॅप तयार केलं आहे. ज्याच्या मदतीनं यूजर्स कधीही आपलं इंटरनेट स्पीड तपासू शकतात. स्पीडटेस्ट डॉट नेटमधून मिळालेल्या आकड्यांनुसार, नॉर्वेमध्ये मागील वर्षभरात मोबाईल इंटरनेटच्या सरासरी स्पीडमध्ये 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या याचा वेग 52.6 मेगाबाइट प्रति सेकंद आहे. नॉर्वेतील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी 'टेलिनॉर'नं मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवला होता. नॉर्वेमध्ये टेलिनॉरसह तीन कंपन्यांनी आपलं मोबाईल नेटवर्क सुरु केलं आहे. टेलिया आणि आइस डॉट नेट या दोन दूरसंचार कंपन्यानी आपलं 4जी नेटवर्क आणखी वेगवान करण्यासाठी बरीच गुंतवणूक केली आहे. मागील महिन्यात टेलीनॉर नेटवर्कवर सरासरी डाऊनलोड स्पीड 58.6 मेगाबाइट प्रति सेकंद होता. तर टेलिया नेटवर्कवर 45.9 मेगाबाइट प्रति सेकंद आहे. ओक्लाच्या चाचणीनुसार जगात सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये नेदरलॅण्ड दुसऱ्या तर हंगेरी तिसऱ्या स्थानावर आहे. (नोट : हा सर्वे ओक्ला या इंटरनेट स्पीड चाचणी करणाऱ्या एजन्सीनं केला आहे.)

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं

माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण

सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर

Embed widget