एक्स्प्लोर
आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर करा प्रायव्हेट चॅट, 'हे' आहेत पाच नवे फिचर्स
व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवरील चॅट हे ग्रुपमधील सर्व सदस्यांना पाहता येते. परंतु आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवरदेखील प्रायव्हेट चॅट करता येणार आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवरील चॅट हे ग्रुपमधील सर्व सदस्यांना पाहता येते. परंतु आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवरदेखील प्रायव्हेट चॅट करता येणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवरचे प्रायव्हेट रिप्लाय करण्यासाठी तीन डॉटवर क्लिक करून प्रायव्हेट रिप्लाय ऑप्शन वापरू शकतो. सध्या हे फीचर केवळ बिटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे फिचर्स सर्वांसाठी उपलब्ध होतील.
नुकतेच व्हॉट्सअॅपने स्टीकर हे फिचर लोकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. त्यात आता पाच नव्या फिचर्सची भर पडणार आहे. व्हॉट्सअॅपने यंदाच्या वर्षात नवनव्या फिचर्स आणि अपडेट्सचा धडाका लावला आहे. आता नव्या अपडेटमध्ये प्रायव्हेट रिप्लाय, व्हॅकेशन मोड, लिंक्ड मीडिया अकाऊंट्स, इनलाइन इमेज, सायलेंड मोड आणि लिंक्ड सोशल या फिचर्सचा समावेश आहे.
त्यासोबतच व्हॅकेशन मोड नावाचे नवीन फिचर मिळणार आहे. याद्वारे आपण सुट्टीवर किंवा फिरायला जातो, तेव्हा या फीचरचा वापर करून व्हॉट्सअॅपच्या नोटीफिकेशन आणि रिंगटोनपासून दूर राहू शकतो.
लिंक्ड सोशल मीडिया अकाऊंट या फिचरद्वारे आपण आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, इन्स्टाग्राम या इतर सोशल मीडिया अॅपशी जोडू शकतो.
याचबरोबर आता आपण आपले व्हॉट्सअॅप सायलेंट मोडवर ठेऊ शकतो. त्यासाठी सायलेंट मोड नावाचे फिचर उपलब्ध होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
