मुंबई : स्मार्टफोन वापरणारे अनेक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. सध्या व्हॉट्सअॅप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट्सॅपमुळे अगदी परदेशातील माणसांसोबतही आपण जोडले जाऊ शकतो. व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. त्या फिचर्सचा वापर करून अनेक युजर्स व्हॉट्सॅप यूज करत असतात. अनेक लोक फोटो आणि व्हिडीओ एडिट करून त्याचं अॅनिमेशन तयार करून शेअर करतात. जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओंचं अॅनिमेशन करायचं असेल तर अत्यंत सोपं आहे. जाणून घेऊया व्हॉट्सअॅपवर फोटोंचे व्हिडीओ कसे तयार केले जातात. किंवा व्हिडीओंमध्ये अॅनिमेशन कसं अॅड केलं जातं.


अॅन्ड्रॉइड फोनमधून GIF व्हिडीओ कसा तयार कराल?


अॅन्ड्रॉइड फोनमध्ये GIF व्हिडीओ पाठवण्यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा.


ज्या व्यक्तीला तुम्हाला GIF व्हिडीओ पाठवायचा असेल त्या व्यक्तीचा चॅटबॉक्स ओपन करा.


त्यानंतर आपल्या स्मार्टफोनमधील फोटो गॅलरीमध्ये जा.


गॅलरीमध्ये गेल्यानंतर ज्या व्हिडीओ किंवा फोटोचं तुम्हाला GIF तयार करायचं असेल त्याला सिलेक्ट करा.


व्हिडीओ सिलेक्ट करण्यासाठी त्यावर टाइम ड्यूरेशन दाखवण्यात येईल त्याला 5 ते 15 सेकंदांसाठी कट करा.


व्हिडीओ कट केल्यानंतर उजव्या बाजूला GIF चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि व्हिडीओ पाठवा.


आयफोनमधून GIF व्हिडीओ कसा पाठवाल?


सर्वात आधी व्हॉट्सअॅप ओपन करा.


जो व्हिडीओ पाठवायचा आहे, त्याचा चॅटबॉक्स ओपन करा.


राइट साइडमध्ये तयार झालेल्या आयकॉनवर क्लिक करा आणि GIF पाठवा.


जर लाईव्ह फोटोचं GIF पाठवायचं असेल तर फोटोमध्ये जाऊन लाईव्ह फोटोवर क्लिक करा आणि लॉन्ग प्रेसनंतर त्यामध्ये GIF चा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक करा. त्यानंतर लाईव्ह फोटो GIF व्हिडीओ फॉर्ममध्ये सेंड होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :