मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या Apple च्या iPhone12 च्या लॉंचिंग कार्यक्रमाने अनेकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची संधी दिली. यामागचे कारण म्हणजे iPhone12 ने त्यांच्या वापरकर्त्यांना चार्जर आणि इअरपॉडची सुविधा दिली नाही. मंगळवारी iPhone12 च्या लॉचिंग कार्यक्रम मोठ्या शानदार पद्धतीने झाला. या कार्यक्रमात कंपनीने चार फोन लाँच केले. ते सर्व 5G तंत्रज्ञानाने युक्त आहेत. ते नेक्स्ट जनरेशन हाय स्पिड वायरलेस नेटवर्कशी जोडले जातील.
Apple ने आपल्या Hi Speed इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिज लॉंच केली आहे. Apple ने आपल्या या इव्हेंटमध्ये iPhone 12 सीरिजचे चार फोन लॉन्च केले आहेत. यामध्ये iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro max या आयफोनचा समावेश आहे. सोबतच नवीन ऑडियो साधने ज्यात होम पॅड आणि मिनी स्मार्ट स्पिकरचा समावेश आहे. नविन iPhone 12 बॉक्समध्ये USB-C ची सुविधाही देण्यात आली आहे.
चार्जरची सुविधा न दिल्याबद्दल मात्र iPhone12 हा सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. यात त्यांची स्पर्धक कंपनी Samsung नेही Apple ला चांगलाच टोला हाणला आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर Galaxy adapter चा फोटो शेअर केला असून त्यात त्यांनी included your Galaxy या शिर्षकाखाली तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी बेसीक चार्जरसह कॅमेरा आणि इतर बऱ्याच सुविधा Galaxy स्मार्टफोन देत असल्याचं म्हटलं आहे.
फोनसोबत चार्जर न देण्याच्या तक्रारीवर Apple कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, 'अनावश्यक कचरा टाळण्यासाठी त्यांनी आपला आयफोन 12 सोबत चार्जर दिलेला नाही.' यासंदर्भात बोलताना जगात 2 अब्जपेक्षा जास्त Apple adapter आधीपासूच आहेत. तसेच आमच्या अनेक ग्राहकांकडे एअरपॉड किंवा हेडफोन आहेत, असे कंपनीचे पर्यावरण, पॉलिसी आणि सोशल इनिशिएटीव्ह विभागाचे उपाध्यक्ष लिसा जॅक्सन म्हणाले.
''वरील गोष्टी न दिल्यामुळे iPhone12 बॉक्स हा अधिक लहान झाला असून आमच्या शिपींग पॅलेटमध्ये आम्ही 70 टक्के अधिक वस्तू बसवू शकतो. त्यामुळे iPhone12 च्या वापरकर्त्यांनी इअरपॉड आणि USB power adapter हे स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागेल" असेही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :
- Festival Sale : दमदार फिचर असणारा Google Pixel 4a काही मिनिटांतच ऑउट ऑफ स्टॉक; OnePlus Nord शी स्पर्धा
- Whatsapp चॅटिंग इंटरेस्टिंग बनवणारे स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल?
- अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल : प्राइम मेंबर्स अन् प्लस सदस्यांना खास सवलत
- iphone 12 Pro max : Apple चा iPhone 12 Pro Max लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत