मुंबई : Google ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेला आपला स्मार्टफोन Pixel 4a फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये सादर केला होता. या सेलमध्ये पिक्सल 4एला युजर्सची प्रचंड पसंती मिळाली. सेलमध्ये हा फोन केवळ 30 मिनिटांतच आउट-ऑफ-स्टॉक झाला. युजर्समध्ये पिक्सल 4a ची मागणी पाहता कंपनी पुन्हा एकदा हा फोन सेलमध्ये सादर करू शकते.


किंमत आणि ऑफर


गेल्या आठवड्यात Google Pixel 4a भारतात 31,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. या फोनवर फेस्टिव्ह सीझनमध्ये सुरु असणाऱ्या फ्लिपकार्ट च्या Big Billion Day 2020 सेलमध्ये 2000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला होता. सेलमध्ये या फोनची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली होती. तसेच, SBI कार्डमार्फत जर फोन खरेदी केला तर 10 टक्क्यांचं अॅडिशनल इस्टंट डिस्काउंटही या फोनवर देण्यात आलं होतं.





Google Pixel 4a स्पेसिफिकेशन्स


Google Pixel 4a 5G स्मार्टफोन 5.8 इंचाच्या फुल-स्क्रिन डिस्प्लेसोबत सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ट्रान्समीस होल देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 3 सोबत पॉली कार्बोनेट युनिबॉडी देण्यात आली आहे. 6GB LPDDR4 रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसोबत यामध्ये 3140 mAh2 बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसरवर काम करतो. फोटो आणि व्हिडीओसाठी Google Pixel 5 प्रमाणेच कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5 मिमी ऑडियो जॅक, स्टीरियो स्पीकर आणि दोन मायक्रोफोन आहेत.


कॅमेरा


Google Pixel 4a स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या संदर्भात बोलायचं झालं तर यामध्ये 12.2 मेगापिक्सल सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये पोर्ट्रेट मोड, टॉप शॉट आणि नाईट मोड यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.


OnePlus Nord सोबत स्पर्धा


Google Pixel 4a 5G ची वनप्लस नॉर्ड स्पर्धा होऊ शकते. वनप्लस नॉर्डमध्ये कंपनीने 6.4 इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले दिला आहे. कंपनीने स्मार्टफोनमध्ये गोरिला ग्लास 5 चं प्रोटेक्शन दिलं आहे. स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसरसोबत येतो. त्याचसोबत नॉर्डमध्ये एंड्रीनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 4115mAh च्या बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :