मुंबई : दिवाळी, दसरा या सणांचा काळ लक्षात घेता Flipkart वर Big Billion Day Sale सुरू आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर चांगल्या ऑफर्सही मिळत आहेत. या सेलमध्ये तुम्ही जर लॅपटॉप खरेदीचा विचार करत असाल तर अमेरिकन कंपनी AVITA ने त्यांचा नवा प्रीमिअम लॅपटॉप Liber V14 चे लिमिटेड एडिशन लॉंच केले आहे. या लॅपटॉपची किंमत 62,990 इतकी आहे. या लॅपटॉपची खरेदी आपण Flipkart वर सुरू असलेल्या Big Billion Day Sale मध्ये खरेदी करू शकतो. तुम्ही जर ही खरेदी SBI च्या कार्डवरून करत असाल तर तुम्हाला यावर 10 टक्के सुट मिळेल.



आकर्षक फिचर्सनी युक्त
याच्या फिचर्सची चर्चा करायची तर AVITA Liber V14 हा अल्ट्रा पोर्टेबल लॅपटॉप आहे. यात पावरफुल इंटेल कोअर i7 दहाव्या जनरेशन प्रोसेसर दिला आहे. यात 1 मेगा पिक्सेलचा वेब कॅमेरा आहे.या व्यतिरिक्त यात 16GB RAM आणि 1TB SSD ची सुविधाही आहे. त्याचसोबत यात UHD ग्राफिक कार्ड देखील आहे. 14 इंच ची फुल HD IPS डिस्प्ले आहे जी अँटी ग्लेयर टेक्नोलॉजीयुक्त आहे. या लॅपटॉपमध्ये ऑप्टीमल टॉप अप वेब कॅमेराही आहे.



10 तासांची बॅटरी बॅकअप
या लॅपटॉपमध्ये 4830mAh ची बॅटरी दिली गेली आहे जी 10 तासांचा बॅटरी बॅकअप देते. या लॅपटॉपचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे याचे डिजाईन होय. याचे वजन 1.25 किलोग्राम इतके आहे. कनेक्टिविटी साठी Avita Liber V14 मध्य़े दोन USB पोर्ट देण्यात आले आहेत. त्यापैकी एक USB टाइप-C पोर्ट आहे तर दुसरा HDMi पोर्ट प्रकारातील आहे. त्याचसोबत एक मायक्रो एसडी कार्ड स्लॉटची सुविधा देण्यात आली आहे.



Lenovo आणि Dell शी होणार टक्कर
नव्या Avita Liber V14 ची टक्कर Lenovo आणि Dell यांसारख्या ब्रँडशी होणार आहे. Dell Vostro Core i5 ची किंमत आता फ्लिपकार्टवर 48,990 रुपये इतकी आहे. हा 8GB रॅम आणि 1TB HHD/256 GB SSD च्या सुविधेसह आहे. यात विंडो 10 होम आणि MS ऑफिस यांच्यासोबत मिळत आहे. या व्यतिरिक्त या लॅपटॉपचे वजन 1.66 किलोग्रॅम आहे. या लॅपटॉप मध्य़े 14 इंचाचा फुल HD LED डिस्प्ले आहे.



या व्यतिरीक्त नव्या Avita Liber V14 ची टक्कर Lenovo शी होणार आहे. कंपनी च्या Ideapad L340 लॅपटॉप ची किंमत फ्लिप्कार्ट वर 65,990 रुपये आहे. हा लॅपटॉप Core i7 9th Gen मधील आहे. हा 8GB रॅम आणि 1TB HHD/256 GB SSD ने युक्त आहे आणि यात विंडो 10 होम अशीही सोय आहे. .यात 4 GB का ग्राफिक्स कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच या लॅपटॉप मध्ये 15.6 चा डिस्प्ले आहे. याचे वजन 2.19 किलोग्रॅम इतके आहे.