भारत-चीनमध्ये सध्या सीमावादावरुन तणाव सुरु आहे. अशातच भारताच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी चीनने डिजीटल माध्यमांचा अवलंब करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. चिनी मोबाईल कंपनी शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये हवामान स्थितीची माहिती सांगणाऱ्या अॅप्लीकेशनमध्ये अरुणाचल प्रदेशातील हवामानाविषयी माहिती दिली जात नाही. अरुणाचलची राजधानी 'इटानगर' असे टाईप केले तर त्यावर काहीचं रिझल्ट येत नाही. यावरुन सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शाओमी कंपनीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
अभियंता आणि युट्युबर गौरव चौधरी यांनी याबद्दलचा स्क्रीनशॉट शेअर करताना शाओमीकडून उत्तर मागितलं आहे. त्याचप्रमाणे संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले यांनी हॉल ऑफ फेम, लेह शाओमीच्या लाइव ब्रॉडकास्ट लोकेशन अॅप्लिकेशनमध्ये टाइप केल्यावर शाओमी मोबाईल "जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना" असा रिझल्ट दाखवत आहे.
Flipkart वर लॉन्च झाला 'हा' भन्नाट प्रीमिअम लॅपटॉप, Lenovo आणि Dell समोर नवे आव्हान
त्यांनी लोकांना आवाहन केले की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण शाओमीकडे उत्तर मागायला हवे, तर भारत सरकारलाही या विषयाची जाणीव करून दिली पाहिजे. यातूनचं ट्विटरवर 'शाओमी जवाब दो' हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये लोकांनी कंपनीला या प्रकरणात जाब विचारला आहे. शाओमीने आता ‘मेड इन इंडिया’ फोन बनवण्याचा दावा केला आहे पण असे दिसते की ते चीनचेच धोरण चालवत आहेत.
लोकांनी नोकिया आणि अन्य बिगर-चीन कंपन्यांच्या फोनमध्ये अरुणाचल प्रदेशातील शहरांचे हवामान तपासले, तेव्हा सर्व काही अचूकपणे सांगितले जात होते. मात्र, जेव्हा चिनी कंपनी 'ऑनर' कंपनीच्या फोनमध्ये तीच गोष्ट तपासली गेली, तेव्हा त्याचाही शाओमीसारखेच रिझल्ट आला. बर्याच लोकांनी त्यांचे फोन तपासले, त्यानंतर स्क्रीनशॉट्स शेअर करत शाओमीला जाब विचारला आहे.
अलीकडेच चीनने म्हटले आहे की भारताने लडाखला बेकायदेशीरपणे केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित केले आहे. त्याचबरोबर लडाखमधील 44 स्ट्रॅटेजिक महत्त्वपूर्ण पुलांबाबतही चीनने निषेध नोंदविला. चीनच्या थयथयाटाचे मुख्य कारण म्हणजे भारताने असे पूल बांधले आहेत, ज्यामुळे चीनला सीमेवर जोरदार टक्कर देणे सोपं होईल. म्हणूनच, तो या प्रकरणांवर वारंवार बोलत आहे.