एक्स्प्लोर
Whatsapp down: तासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प
तांत्रिक बिघाडामुळे तासाभरापासून मेसेज पाठवणं, व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल करणं सर्व काही बंद झालं होतं.
मुंबई: लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉटअसअॅप तासभरापासून ठप्प झालं. तांत्रिक बिघाडामुळे तासाभरापासून मेसेज पाठवणं, व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल करणं सर्व काही बंद झालं होतं.
तासाभराच्या काळानंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालं. मात्र व्हॉट्सअॅप का बंद झालं होतं, तांत्रिक बिघाड नेमका काय होता, हे अजून कळू शकलेलं नाही.
व्हॉट्सअॅपकडून अधिकृत माहिती दिल्यानंतर नेमका बिघाड काय होता हे समजू शकेल. मात्र दुपारी दीड ते अडीच या तासभरासाठी व्हॉट्सअॅप बंद झाल्याने, मेसेज सेंड-रिसिव्ह करणं बंद झालं.
जगभरातील 180 देशांमध्ये व्हॉट्सअॅप क्रॅश झालं. यामध्ये भारत, आयर्लंड, रशिया, मलेशिया, झेक प्रजासत्ताक, स्पेन, इस्रायल, केनिया यासारख्या देशांचा समावेश होता.
अनेकांना व्हॉट्सअॅप बंद आहे हे कळलंही नाही. तसंच अनेकांनी स्वत:च्या नेटवर्कमध्ये अडचणी असतील असा तर्क लावला. पण ट्विटर आणि सोशल मीडियावर अनेकांनी याबाबतचे मेसेज केल्यानंतर, जगभरात व्हॉटअसअॅप क्रॅश झाल्याचं समोर आलं.
तासाभरानंतर भारतात पुन्हा मेसेज सेंड-रिसिव्ह होऊ लागले.
दरम्यान, व्हॉट्सअॅप बंद झाल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी विनोदांचा पाऊस पाडला.
ट्विटरवर टॉप ट्रेण्ड
व्हॉटअसअॅप बंद झाल्याचे मेसेज सर्वात आधी ट्विटरवर पाहायला मिळाले. अनेकांनी तर व्हॉटअसअॅप खरंच बंद झालंय का हे चेक करण्यासाठी मेसेज करुन पाहण्याऐवजी, ट्विटर लॉग इन करुन पाहिलं.
दुसरीकडे ट्विटरवरील वाढत्या मेसेजमुळेच आणि जगभरातून व्हॉटअसअॅप बंद असल्याचे मेसेज येऊ लागल्याने, ट्विटरवर #whatsappdown हा टॉप ट्रेण्ड पाहायला मिळाला.
हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी व्हॉटअसअॅप बंद असल्याची माहिती दिली. अनेकांनी व्हॉटअसअॅप बंद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जोक्सवर जोक्स ट्विट केले.
संबंधित बातम्या
व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस
व्हॉट्सअॅप बंद झाल्याने ट्विटरवर 'लोड'!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement