एक्स्प्लोर

व्हॉईसकॉलद्वारे व्हॉट्सअॅप हॅक, यूझर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना

एका व्हॉईसकॉल सरशी तुमच्या स्मार्टफोनमधील सगळी माहिती, फोटो, व्हिडिओ हॅकरच्या हाती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरातील यूझर्सना व्हॉट्सअॅप अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : एक कॉल आणि तुमचं व्हॉट्सअॅप हॅक! तुमच्या-आमच्या सर्वाधिक वापरातलं अॅप अर्थात व्हॉट्सअॅप हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. त्यामुळे जगभरातील यूझर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मित्र-मैत्रिणींच्या टाईमपास गप्पा असो, ऑफिसातील कामं असोत, आई-वडिलांना निरोप पोहचवणं किंवा पैशांची देवाण-घेवाण असो, व्हॉट्सअॅपवाचून आजकाल बऱ्याच जणांचं पान हलत नाही. पण या व्हॉट्सअॅपवर हॅकर्सची वक्रदृष्टी पडल्यामुळे अनेक यूझर्स चिंताग्रस्त झाले आहेत. एका व्हॉईसकॉल सरशी तुमच्या स्मार्टफोनमधील सगळी माहिती, फोटो, व्हिडिओ हॅकरच्या हाती जाण्याची शक्यता आहे. इस्रायली सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओ ग्रुपने एक कोड डेव्हलप केला आहे. या कोडच्या मदतीने व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करणं सोपं झाल्याची माहिती 'द फायनान्शिअल टाईम्स' या वृत्तपत्राने दिली आहे. एनएसओ ग्रुपने मात्र हॅकिंगचं वृत्त फेटाळलं आहे. Whatsapp Hacking | व्हॉट्सअॅप वापरताना सावधान, व्हॉईस कॉलच्या साहाय्याने अकाऊंट हॅकिंग एनएसओ कंपनी पेगासस सॉफ्टवेअर वापरते. ज्यामुळे त्यांना कुठल्याही स्मार्टफोनमधील संभाषण, कॅमेरा आणि लोकेशनची माहिती मिळवणं शक्य आहे. तरी आपण डेटा हॅकिंग नाही तर डेटा सुरक्षेवर लक्ष देत असल्याचं एनएसओ कंपनीने स्पष्ट केलं आहे. शिवाय यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासनही दिलं आहे. व्हॉट्सअॅपची मालकी आता फेसबुककडे आहे. आधीच फेसबुकला डेटा लीकचं ग्रहण लागलं आहे. ते नीट सांभाळण्यासाठी नाकीनऊ येत असतानाच आता त्यांच्याच मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या डेटा सुरक्षेवर मोठं संकट उद्भवलं आहे. व्हॉट्सअॅपला डेटा हॅकची माहिती कळताच त्यांनी तात्काळ त्यावर उपाययोजना केल्या. जगभरातील यूजर्सना अॅप अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपडेटमध्ये हा लूपहोल फिक्स करण्यात आल्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रॉईड, अॅपल, विंडोज, गूगल यापैकी कुठल्याही सिस्टमचा स्मार्टफोन असला, तरी त्यातलं व्हॉट्सअॅप तात्काळ अपडेट करा, अन्यथा एक कॉल येईल आणि तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होईल.

महत्त्वाच्या बातम्या

boAt Aavante Bar Prime Soundbars: घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
घरबसल्या थिएटरचा फिल हवाय? खिशाला परवडणारे 3 साऊंडबार, boAtच्या प्रॉडक्टची किंमत अन् फिचर्स जाणून घ्या
Best TWS Earbuds: दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
दर्जेदार ऑडिओ ते कॉल्स अन् दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम TWS इअरबड्स; 4 जबरदस्त मॉडेल्स, वाचा सविस्तर माहिती
boAt Dual Subwoofer Soundbars: boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
boAt चे सर्वोत्तम 3 ड्युअल सबवूफर साउंडबार्स वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही; वाचा A to Z माहिती
Meta News : ऑनलाइन सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटा बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमत
सुरक्षा सर्वोपरी, तडजोड अशक्य! केंद्राच्या दबावानंतर मेटाचा मोठा निर्णय; बालसुरक्षेबाबतच्या बाबींचा अहवाल देण्यास सहमती

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Nagpur Crime: खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
खिशातून बळजबरीने 8 हजार अन् मोबाईल हिसकावले, नियमबाह्य पद्धतीने पाच तरुणांना बेदम मारहाण; नागपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप
Manoj Jarange Patil in Beed: मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंच्या सभेसाठी चौक खचाखच भरला, मराठा बांधवांची गर्दी
मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंनी चौक खचाखच भरुन टाकला, मराठा बांधवांची गर्दी
Sara Tendulkar on Ganeshotsav: दिसतेस जणू अप्सराच! सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक व्हायरल; साडी, दागिने अन् केसात गजरा, वहिनीसोबत दिली खास पोज
दिसतेस जणू अप्सराच! सारा तेंडुलकरचा खास गणेशोत्सव लूक व्हायरल; साडी, दागिने अन् केसात गजरा, वहिनीसोबत दिली खास पोज
Narendra Mehta and Asgar ali vora: भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget