एक्स्प्लोर
Advertisement
स्टोरेजची चिंता मिटली, व्हॉट्सअॅपचं लवकरच नवं फीचर
आयफोनमध्ये जे स्टोरेज अॅक्सेस फीचर दिलं जातं, ते आता अँड्रॉईड ग्राहकांनाही मिळणार आहे.
मुंबई : तुमच्याही मोबाईलमध्ये सर्वाधिक रॅम घेणारं व्हॉट्सअॅप हे एकमेव अॅप असेल. मात्र व्हॉट्सअॅप यासाठी एक नवं फीचर जारी करणार आहे. ज्यामुळे अँड्रॉईड युझर्सनाही आता आयफोनप्रमाणे स्टोरेज कंट्रोल करता येईल.
आयफोनमध्ये असा एक ऑप्शन दिला जातो, ज्यामुळे चॅटमधून थेट स्टोरेज ऑप्शनमध्ये जाता येतं. यामध्ये किती मीडिया फाईल्स सेंड केल्या आणि किती मेसेज सेंड केले याची माहिती मिळते. या फाईल्स आणि स्टोरेज क्लिअर केल्यानंतर रॅम फ्री होते.
आतापर्यंत आयफोनधारकांसाठीच हे फीचर उपलब्ध होतं. मात्र आता अँड्रॉईड युझर्सनाही हे फीचर दिलं जाणार आहे. अँड्रॉईडमध्ये सध्या पाठवलेल्या फाईल्स निवडून स्वतः डिलीट कराव्या लागतात. मात्र आयफोनधारकांसाठी व्हॉट्सअॅपने अगोदरच रॅम क्लिअर करण्यासाठी खास फीचर दिलेलं आहे.
दरम्यान व्हॉट्सअॅप लवकरच रिव्होक नावाने मेसेज अनसेंड करण्यासाठी फीचर लाँच करणार आहे. यामुळे तुम्ही चुकून पाठवलेला मेसेज तुम्ही रिव्होक करु शकता. लवकरच ही नवी अपडेट जारी केली जाणार असल्याचीही माहिती आहे.
संबंधित बातमी : व्हॉट्सअॅपवर चुकून मेसेज सेंड झाला? आता चिंता करु नका!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement