एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'Forwarded Message', व्हॉट्सअॅपचं लवकरच नवं फीचर
या नव्या फीचरमुळे एखादा मेसेज कुणाला फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असं लिहिलेलं असेल. अँड्रॉईड व्हर्जन 2.18.67 मध्ये ही नवी अपडेट मिळेल.
मुंबई : व्हॉट्सअॅपचा अनुभव आणखी खास बनवण्यासाठी कंपनी नवनवीन फीचर देत आहे. सध्या कंपनी एका नव्या फीचरवर काम करत आहे. या नव्या फीचरमुळे एखादा मेसेज कुणाला फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असं लिहिलेलं असेल. त्यामुळे हा मेसेज कुणाचा तरी फॉरवर्ड केलाय, हे स्पष्ट होईल.
WABetaInfo ने या फीचरबाबत माहिती दिली आहे. अँड्रॉईड व्हर्जन 2.18.67 मध्ये ही नवी अपडेट मिळेल. याशिवाय फीचरचा विंडोज व्हॉट्सअॅपमध्येही समावेश करण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड आणि विंडोजच्या बीटा युझर्सना हे फीचर चाचणीसाठी दिलं आहे. या फीचरनंतर तुम्ही ग्रुपचं डिस्क्रीप्शनही बदलू शकता, जसं आतापर्यंत प्रोफाईलमध्ये डिस्क्रीप्शन जोडलं जात होतं. ग्रुपचं डिस्क्रीप्शन कुणीही बदलू शकतं किंवा त्यामध्ये बदल करु शकतं. याचं नोटिफिकेशन सर्वांना जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement