एक्स्प्लोर
Advertisement
व्हाटसअॅप बंद होणार ?
मुंबई : व्हाटसअॅपवर एन्सक्रिप्शन हे नवे अपग्रेडेशन आल्याने एखाद्या ग्रुपमधील दोन व्यक्तींचा संवाद इतरांना वाचता येत नाही. याचा दहशतवादी आणि समाजकंटकांना फायदा होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हरियाणातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. यावर येत्या 29 जुलैला सुनावणी होणार आहे.
व्हाटसअॅपवर यूजर्स सेक्यूरिटी सिस्टीम हे नवे अपग्रेडेशन सेट झाल्यानंतर कोणत्याही ग्रुपमधील यूजर्सला दोन व्यक्तींमधील संवाद वाचता येत नाही. त्यामुळे दहशतवादी आणि समाजकंटकांमधील संवाद सेक्यूरिटी संस्थासोबतच स्वत: व्हाटसअॅपला हे संवाद डिकोड करता येणार नाहीत.
जर या याचिकेवर व्हाटसअॅपच्या विरोधात निर्णय लागल्यास इतर मोबाईल अॅप कंपनीवरही गदा येणार आहे. कारण अनेक मोबाइल अॅपलिकेशनसही सेक्यूरिटीसाठी 256 बीटचे एन्सक्रिप्शनचा वापर करित आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement