Sim Card : आजकाल प्रत्येकजण मोबाईलचा वापर करतो. सुरुवातीला फक्त कॉलिंगसाठी सुरु करण्यात आलेला फोन विज्ञान-तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगत होत गेला. आज याच फोनचं स्मार्टफोनमध्ये रूपांतर झालं आहे. मात्र, इतके बदल घडूनही मोबाईलचं मुख्य काम कॉलिंग अजूनही अबाधित आहे. याच कॉलिंगसाठी गरजेचं असतं ते सिम कार्ड. तुमच्या मोबाईलमध्ये जर सिम कार्डच नसेल तर कॉल करणं केवळ अशक्य आहे. तंत्रज्ञानाच्या बदलासह, सिमकार्डदेखील बदलत गेलं. आजकाल आधुनिक स्मार्टफोनमध्येही ई-सिमचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला सिम कार्डचा फुल फॉर्म माहित आहे का? नसेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला सिम कार्डशी संबंधित रंजक माहिती सांगणार आहोत.
सिम कार्डचा फुल फॉर्म काय?
सिम कार्ड हे एक प्रकारचं छोटं स्मार्ट कार्ड आहे. त्याला एक चिप जोडलेली आहे. ते वापरण्यासाठी मोबाईल फोनमध्ये GSM (Global System for Mobile) टाकावे लागते. हे GSM मोबाईल फोनमधील सदस्यांसाठी डेटा स्टोर करण्याचं काम करतं. सिम कार्डमध्ये साठवलेल्या डेटामध्ये यूजरची ओळख, लोकेशन, फोन नंबर, नेटवर्क, पर्सनल डेटा, मोबाईल नंबरची कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मेसेजिंगचा समावेश असतो.
सिम कार्ड फक्त जीएसएम मोबाईल फोनवर वापरता येते. सिम कार्डचा फुल फॉर्म म्हणजेच (Subscriber Identity Module) किंवा (Subscriber Identification Module) असे आहे.
सिम कार्ड कसे बनवले जाते?
सिम कार्ड बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. सर्वात आधी, प्लास्टिकचा एक छोटा तुकडा तयार केला जातो आणि त्यात सिलिकॉन आणि एक चिप बसवली जाते. त्यानंतर ते एका कोडद्वारे Jio, Airtel, Idea इत्यादी विविध नेटवर्कशी मग हे सिम मोबाईलमध्ये टाकताच ते त्या नेटवर्कशी कनेक्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या :