Telecom Department : कॉल डिस्कनेक्शनची (Call Disconnection) वाढती प्रकरणे आणि कॉलिंग गुणवत्ता (Calling Quality) सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने (DOT) देशातील मोठ्या दूरसंचार ऑपरेटर्ससोबत सेवा आणि गुणवत्तेशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. ही बैठक अशा वेळी झाली, जेव्हा देशभरात 5G नेटवर्क (5G) सुरू झाले आहे. दरम्यान आतापर्यंत 50 शहरांमध्ये 5G नेटवर्क आहे.


विविध दूरसंचार कंपन्यांचा सहभाग


या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार सचिव के. राजारामन उपस्थित होते. यामध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनसह विविध दूरसंचार सेवा कंपन्यांनी सहभाग घेतला. सुत्रांच्या माहितीनुसार, बैठकीतील चर्चेत या कंपन्यांना देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यास सांगण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दूरसंचार कंपन्यांनी सेवा गुणवत्तेची सध्याची पातळी आणि मानके यावर तपशीलवार सादरीकरण केले.


 


टेलिकॉम कंपन्यांकडून अॅक्शन प्लॅन मागवला
मोबाईल वापरकर्त्यांना वारंवार कॉल ड्रॉप आणि इंटरनेटचा वेग कमी होण्याचा सामना करावा लागत होता. आता सरकारने या प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत. दूरसंचार विभागाने कॉल ड्रॉप्स थांबवण्यासाठी आणि डेटा स्पीड वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून अॅक्शन प्लॅन मागवला आहे. सरकारने टेलिकॉम कंपन्यांना सेवा सुधारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दूरसंचार सेवांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने ही कारवाई केली आहे.



दूरसंचार मंत्र्यांनी दिले होते संकेत


या वर्षी सप्टेंबरमध्ये दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संकेत दिले होते की, दूरसंचार सेवेची क्वालिटी स्टॅंडर्ड अधिक कडक केली जाऊ शकतात. उद्योगांना दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेत आवश्यक सुधारणा कराव्या लागतील. तसेच सरकारने या क्षेत्रात मोठ्या सुधारणाही सुरू केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


 


बैठकीचा अजेंडा काय होता?
दूरसंचार सचिव के राजारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियासह दूरसंचार सेवा कंपन्या उपस्थित होत्या. दूरसंचार कंपन्यांना देशातील दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत करणारे धोरण आणि ठोस उपाय ओळखण्यावर चर्चा करण्यात आली.



दूरसंचार सेवांचा दर्जा सुधारण्यावर चर्चा


दूरसंचार विभागाने कॉल डिस्कनेक्शनची वाढती प्रकरणे आणि इतर सेवांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन कंपन्यांसोबत बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत कंपन्यांना समस्या संबंधित क्षेत्र ओळखण्यास सांगण्यात आले. विभागातील सूत्रांनी सांगितले की, ते बऱ्याच काळापासून सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्द्यांवर विचार करत आहे, तसेच कंपन्यांना समस्या असलेली क्षेत्रे ओळखण्यास तसेच सरकारकडून पावले उचलण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभाग कायदेशीर चौकट आणि धोरणात्मक उपाययोजनांवर विचार करत आहे, ज्यामुळे सेवेचा दर्जा अधिक चांगला मिळू शकेल.


इतर बातम्या


Reliance Jio चा धमाका! राज्यातील आणखी दोन शहरांमध्ये 5G सेवा सुरू