एक्स्प्लोर
वोडाफोनची जबरदस्त ऑफर, आता 67% इंटरनेट डाटा मिळणार

नवी दिल्ली: वोडाफोनने सोमवारी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर दिली आहे. त्यांच्या यूजर्सना आता 67% डेटा पॅक वापरण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी 650 रुपयांच्या डेटा पॅकवर 3जीबीचा 3G/4G चा डेटा मिळत होता. पण कंपनीने यात 67% वाढ केल्याने, आता याच किमतीत 5 जीबीचा डेटा पॅक मिळणार आहे. याचप्रमाणे, 499 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये 3G/4G साठी 50% अधिकचा डेटा मिळेल. म्हणजेच आता 499 मध्ये 2 जीबी ऐवजी 3 जीबी डेटा मिळणार आहे. तर 999 रुपयांमध्ये 3G/4G पॅकमध्ये 10 जीबीचा डेटा मिळेल. यामुळे ग्राहकांचा 54%फायदा होणार आहे. वोडाफोन इंडियाचे संचालक संदीप कटारिया यांनी सांगितले की, ''आम्ही डेटा अधिकाधिक सुलभ आणि वापरण्या योग्य बनवत आहोत. या ऑफर ऑनलाईन यूजर्ससाठी मोठी परवणीच ठरणार आहेत.''
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक























