एक्स्प्लोर
20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोनचं 15 नोव्हेंबरला भारतात लाँचिंग
मुंबई: चीनी मोबाइल कंपनी विवो 15 नोव्हेंबरला भारतात आपला नवा स्मार्टफोन V5 लाँच करणार आहे. विवो V5 स्मार्टफोनचा लाँचिंग इव्हेंट मुंबईमध्ये होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 ते 25 हजारांच्या दरम्यान असू शकते.
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा सेल्फी कॅमेरा. तब्बल 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींना हा स्मार्टफोन आकर्षित करु शकतो.
विवो V5 स्मार्टफोनचे खास फीचर:
5.2 इंच फूल एचडी (1080×1920 पिक्सल) डिस्प्ले
4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी
फ्रंट फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता
20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
विवो V5बाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गोल्ड कलरमध्ये हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी विवोनं आपला V3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement