Vivo V25 Pro 5G : स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपला नवीन कॅमेरा फोन Vivo V25 Pro 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Vivo V25 Pro Vivo V23 Pro चा सक्सेसर म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. 64 एमपी रियर कॅमेरा सेटअपसह या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आहे. तसेच फोनमध्ये कलर चेंजिंग बॅक पॅनल आहे. हा फोन ब्लॅक आणि सेलिंग ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.53 इंचाची 3D स्क्रीन आहे. जाणून घ्या फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल..


Vivo V25 Pro 5G चे स्पेसिफिकेशन


Vivo V25 Pro 5G ला प्रिमियम डिझाईनमध्ये रंग बदलून बॅक आणि मेटल फ्रेमसह देण्यात आला आहे.
Vivo V25 Pro 5G फोनमध्ये Android 12 आधारित Funtouch OS 12 देण्यात आला आहे.
Vivo V25 Pro 5G मध्ये 6.56-इंच फुल एचडी प्लस AMOLED 3D डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
Vivo V25 Pro 5G फोनमध्ये डायमेन्सिटी 1300 प्रोसेसरसह 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज आहे.
या फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरलाही सपोर्ट करण्यात आला आहे.
Vivo V25 Pro 5G ला 4,830mAh बॅटरी आहे, जी 66W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo V25 Pro 5G मध्ये 5G, 4G, GPS, 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देखील दिले गेले आहेत.


Vivo V25 Pro 5G कॅमेरा


Vivo V25 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64 mp प्राथमिक लेन्स, आणखी 8 mp अल्ट्रा-वाइड आणि 2 mp मॅक्रो लेन्स समाविष्ट आहेत. फोनवरून कमी प्रकाशातही शार्प इमेजेस क्लिक केल्या जाऊ शकतात असा दावा कंपनीने केला आहे. कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशनला देखील सपोर्ट करतो. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.


Vivo V25 Pro 5G किंमत


Vivo V25 Pro 5G फोन ब्लॅक आणि सेलिंग ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज 35,999 रुपयांना आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज 39,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून सहज खरेदी केला जाऊ शकतो. फोनची विक्री 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. याशिवाय फोनचे प्री-बुकिंगही करता येते.


महत्वाच्या बातम्या :