Independence Day 2022 Stickers : यंदा 15 ऑगस्ट 2022 (Independence Day 2022) रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशात ठिकठिकाणी स्वातंत्र्यमहोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. याच उत्सवानिमित्त तुम्हाला देखील तुमच्या मित्र-मंडळी, कुुटुंबियांना शुभेच्छा पाठवायच्या असतील. यासाठी Google Play Store वर नवीन फिचर अपडेट करण्यात आले आहे. खरंतर सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकजण व्हॉट्सअॅपवरून शुभेच्छा देणं पसंत करतात. यालाच अधिक मनोरंजक बनविण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्स आणि GIF च्या माध्यमातून तुमच्या मित्र-मंडळींना शुभेच्छा पाठवू शकतात.

  


75 वा स्वातंत्र्यदिन 2022 साजरा करण्यासाठी तुम्ही देखील अप्रतिम WhatsApp स्टिकर्स आणि GIF वापरू शकता. WhatsApp विशेषतः स्वातंत्र्य दिनासाठी स्टिकर्स ऑफर करत नसले तरी यूजर्सना  Google Play Store वरून स्टिकर पॅक डाऊनलोड करण्याची परवानगी देते. WhatsApp वर स्वातंत्र्यदिनाचे स्टिकर्स आणि GIF कसे पाठवायचे हे जाणून घ्या.  


Independence Day 2022 WhatsApp स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल?



  • तुमच्या Android फोनवर WhatsApp अॅप ओपन करा.

  • कोणताही चॅटबॉक्स ओपन करा.

  • चॅटबॉक्सवर क्लिक करा आणि तेथे इमोजी पर्यायावर टॅप करा.

  • आता, "+" पर्यायावर टॅप करा.

  • खाली स्क्रोल करा आणि "Get More Stickers" पर्यायावर टॅप करा.

  • आता WhatsApp तुम्हाला Google Play Store वर घेऊन जाईल.

  • प्ले स्टोअरवर whatsapp स्टिकर पॅक शोधा.

  • तुम्हाला आता अनेक थर्ड पार्टी स्टिकर पॅक अॅप्स दिसतील. तुमच्या फोनवर अॅप इंस्टॉल करा.

  • अॅपवर तुमच्या आवडीचा स्टिकर पॅक निवडा.

  • तुम्ही निवडलेला स्टिकर पॅक व्हॉट्स अॅपवरील माय स्टिकर्स विभागात जोडला जाईल

  • आता तुम्ही तुमचे आवडते स्टिकर्स तुमच्या संपर्क, कुटुंब आणि मित्रांना पाठवू शकता.


टीप: येथे हे स्पष्ट करा की तुम्ही तुमच्या मोबाईलवरून थर्ड पार्टी स्टिकर पॅक काढल्यास, स्टिकर पॅक व्हॉट्स अॅपवरूनही काढून टाकला जाईल.


स्वातंत्र्य दिन 2022 साठी WhatsApp GIF कसे पाठवाल?



  • तुमच्या फोनवर व्हॉट्स अॅप उघडा.

  • कोणताही चॅटबॉक्स  उघडा.

  • GIFs चिन्हावर क्लिक करा.

  • स्वातंत्र्य दिन 2022 GIF शोधा.

  • तुमच्या आवडीचा स्वातंत्र्यदिन GIF निवडा आणि पाठवा पर्यायावर क्लिक करा.


महत्वाच्या बातम्या :