Samsung New Phone : सॅमसंगने आपला प्रिमियम सीरिज फोन Samsung Galaxy Flip 4 आणि Fold 4 लॉन्च केला आहे. लाँच झालेल्या फोनमध्ये एक फ्लिप आणि दुसरा फोल्ड आहे. फ्लिप फोनची स्क्रीन 6.7 आहे. पण बंद केल्यावर ती 1.9 इंच होते. दुसरा फोल्ड फोन 7.6-इंचाचा आहे. परंतु फोल्ड केल्यावर, याचा आकार कमी होऊन 6.2 इंच होतो. याच्या फ्लिप आणि फोल्ड क्लोजरमुळे ते फ्लिप आणि फोल्ड फोन म्हणून ओळखले जातात. हे प्रोफेशनल फोन आहेत. ज्यात रॅम आणि स्टोरेज हे लॅपटॉपच्या बरोबरीचे आहेत.
कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात मोठी बाजारपेठ असलेल्या सॅमसंगने धारिष्ट धाखवत बिग बजेट स्मार्टफोन ऑफलाइन लॉन्च केलाय. याआधी कोरोनामध्ये अनेक मोठे स्मार्टफोन्स ऑनलाइन लॉन्च झालेत, अशात तीन वर्षांनंतर पहिलाच बिग बजेट स्मार्टफोन्स असल्यानं टेक गॅजेट इंडस्ट्री रुळावर येत असल्याचे संकेत आहे.
मुंबईत पार पडलेल्या सॅमसंगच्या लॉन्चमध्ये ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या गॅलॅक्सी ब्रॅण्डच्या झेड फ्लिप-4 आणि फोल्ड-4 बाजारात आणले आहेत. 16 ऑगस्टपासून ह्या फोल्डेबल फोनची प्री-बुकिंग सुरु करण्यात आली होती. गॅलॅक्सी झेड फ्लिप-4 हा नव्या स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसर आणि 3700 एमएएच बॅटरीसोबत बाजारात उपलब्ध झालाय. सोबतच, अर्ध्या तासात 50 टक्क्यांपर्यंत तुम्ही हा फोन चार्ज करु शकणार आहात. रिअर साइडला दोन कॅमेऱ्यांसोबत हा फोन उपलब्ध असेलज्यात दोन्ही लेन्स 12 मेगापिक्सलच्या असणार आहे तर फ्रंटला 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजपासून पुढे असलेला हा स्मार्टफोन 89 हजार 999 रुपयांना बाजारात उपलब्ध असेल.
दुसरीकडे, ॲपलच्या आयफोन 13 प्रो मॅक्सच्या फिचरला टक्कर देणाऱ्या सॅमसंग गॅलॅक्सी झेड फोल्ड-४ देखील बाजारात आणण्यातआलाय. ज्यात 7.6 इंच मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८+ जेन प्रोसेसर आणि ४४०० एमएएच बॅटरीसोबत हा फोन उपलब्ध असेल. रिअरसाइडला तीन कॅमेऱ्यांसोबत हा फोन उपलब्ध असून यात वाइड ५० मेगापिक्सल, अल्ट्रा-वाइड १२ मेगापिक्सल आणि १० मेगापिक्सलटेली लेन्स उपलब्ध आहे. फ्रंटला १० मेगापिक्सलचा कॅमेरा असून युडीसी 4 मेगापिक्सलचा आहे. १२ जीबीच्या रॅमसोबत हा फोनउपलब्ध असून स्टोरेज क्षमता २५६जीबी/५१२जीबी/१टीबी असेल. १ लाख ५४ हजार ९९९ रुपयांपासून ह्या फोल्डेबल फोनची सुरुवातआहे.
सोबतच दोन्ही फोनवर ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत. ज्यात प्री-बुकिंग केल्यास गॅलॅक्सी वॉच-४ २ हजार ९९९ रुपयात उपलब्धअसेल. या व्यतिरिक्त फोल्ड-४ वर एचडीएफसी बॅंकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत ८ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील उपलब्धअसेल तर फ्लिप-४ वर ७ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. दोन्ही फोन आयपीएक्स८ वॉटर रेजिस्टन्स असून गॅलॅक्सी झेडमालिकेतील सर्वात टफ फोल्डेबल फोन्स असल्याचा दावा सॅमसंगचा आहे.
कोव्हिड काळात अनेक स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन होताना बघायला मिळाली. अशात कोव्हिडच्या निर्बंधांमुळे लॉन्च देखीलऑनलाइन झालेत. मात्र, मागील काही महिन्यात अनेक स्मार्टफोन्सच्या ऑनलाइन विक्रीत घट बघायला मिळाली आहे. अशात, पुन्हाएकदा सॅमसंगसाठी ऑफलाइन ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्यानं प्रीमियम फोनचा लॉन्च ऑफलाइन करत ग्राहकांना आकर्षितकरण्याचा फंडा वापरला जातोय.