एक्स्प्लोर
इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा
इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला आहे. आता इन्फोसिसची जबाबदारी कोणावर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विशाल सिक्का यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.
विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर शेअर बाजारात 200 अकांची घसरण झाली असून इन्फोसिसच्या शेअरमध्ये 4 टक्के घट झाली आहे.
2014 साली कंपनीचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विशाल सिक्का यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले होते.
इन्फोसिसमध्ये 2014 पर्यंत सह-संस्थापक असणाऱ्यांनीच कंपनीचं नेतृत्व केलं होतं. पण विशाल सिक्का हे पहिलेच असे सीईओ होते की जे इन्फोसिसचे सह-संस्थापक नव्हते.
विशाल सिक्का यांची 1 ऑगस्ट 2014 साली कंपनीच्या सीईओ आणि एमडीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान, विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर या महत्त्वाच्या पदावर कुणाची वर्णी लागणार याचीच आयटी क्षेत्रात चर्चा सुरु आहे.
कोण आहेत विशाल सिक्का?
विशाल सिक्का यांनी बडोदाच्या एमएस विद्यापीठातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली.
इन्फोसिसमध्ये येण्याआधी सिक्का हे जर्मनीतील सॅप कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यकारी सदस्य होते. तिथं त्यांच्यावर उत्पादनांची जबाबदारी होती. ज्यामध्ये क्लाउड अॅप्लिकेशन, अॅनालिटिक्स, मोबाइल यांचा समावेश होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
