एक्स्प्लोर
VIDEO : शाळा चुकवणाऱ्या मुलाला धडा शिकवण्यासाठी बापाची क्रूर शक्कल

एका पित्याने शाळा चुकवणाऱ्या आपल्या 17 वर्षीय मुलाला धडा शिकवण्यासाठी अभद्र आणि क्रूर शक्कल लढवली. मुलाला शिस्त लावण्यासाठी चक्क त्याच्याशी बॉक्सिंग खेळून त्याला रक्तबंबाळ करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे या पित्याने या सर्वप्रकाराचा व्हिडीओ शूट करून तो फेसबुकवर पोस्ट केला आहे.
अमेरिकेच्या व्हिर्जिनिया शहरात हा सर्व प्रकार घडला.
आपला मुलगा शाळेत गैरवर्तन करतो. मुलगा न सांगताच वर्गाच्या बाहेर जातो. तो घरी येत नाही, तो नेमकं काय करतो हे मला सांगत नाही. म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी मी त्याच्याशी बॉक्सिंग खेळत असल्याचं या वडिलाने व्हिडीओच्या सुरुवातीला सांगितले आहे.
मी सांगितलेली एकही गोष्ट तो ऐकत नाही. त्याच्या मनाला येईल, तसं तो वागतो. त्यामुळे त्याला शिस्त लावणं आवश्यक आहे. मात्र ही केवळ शिस्त नव्हे तर स्वसंरक्षणाचाही धडा आहे, असंही या बापाने म्हटलं आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion



















