एक्स्प्लोर
सौर उर्जेवर चार्ज होणारी पॉवर बँक लाँच, किंमत 599 रु.

मुंबई: यूआयएमआय टेक्नोलॉजीनं सौरउर्जेवनर चार्ज होणारी छोटी पॉवर बँक लाँच केली आहे. ही पॉवर बँक वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ असणार आहे. तसेच यासारखे अनेक फीचर यामध्ये आहेत. ही पॉवर बँकमध्ये सौरउर्जा आणि वीज या दोन्हीवर चार्ज करता येणार आहे. याची किंमत फक्त 599 रु. आहे. यूआयएमआयनं U3 सोलर पॉवर बँकनंतर याचं छोटं व्हेरिएंट यूआयएमआय U3 मिनी पॉवर बँक लाँच केली. सोलार एनर्जीसोबत यामध्ये टॉर्च पॅनलही देण्यात आलं आहे. 150 ग्राम वजनाची ही पॉवरबॅक फारच हलकी असून ती कुठेही नेणं सहज शक्य आहे. याचा आकार देखील पातळ असून फारच आकर्षक आहे. यूआयएमआय टेक्नोलॉजिचे मार्केटिंग मॅनेजर अभिनय प्रताप सिंह यांनी सांगितलं की, 'यूआयएमआय U3 मिनी रबर आणि प्लास्टिक फिनिश मटेरिअलनं तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळे हे वॉटरप्रूफ आहे.च 4000 mAh क्षमतेची ही पॉवर बँक ओवरहीटिंगशिवाय कोणताही फोन 1 ते 2 वेळा चार्ज करु शकतं. यामध्ये बॅटरी इंडिकेटर लाइट्स देखील आहेत. जे शिल्लक सौर उर्जा आणि चार्जिंग असल्याचं दाखवत.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहिल्यानगर
राजकारण






















