एक्स्प्लोर

तुमचं मोबाईल बिल आणखी स्वस्त होणार, 'ट्राय'चा मोठा निर्णय

1 ऑक्टोबर 2017 पासून 14 पैसे प्रती मिनिटांऐवजी 6 पैसे प्रती मिनिट आययूसी वसूल केला जाईल.

नवी दिल्ली : तुमचं मोबाईल बिल 1 ऑक्टोबर 2017 पासून आणखी स्वस्त होणार आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने मोबाईल टू मोबाईल कॉलसाठी आययूसी म्हणजेच इंटरकनेक्शन चार्ज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2017 पासून 14 पैसे प्रती मिनिटांऐवजी 6 पैसे प्रती मिनिट आययूसी वसूल केला जाईल. रिलायन्स जिओ वगळता इतर कंपन्यांनी आययूसी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र ट्रायने सर्व कंपन्यांना दणका देत ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉल जोडण्यासाठी आययूसी द्यावा लागतो. हा चार्ज सध्या 14 पैसे होता. मात्र आयडिया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांनी हा चार्ज वाढवण्याची मागणी केली होती. तर रिलायन्स जिओने हा चार्ज बंद करण्याची मागणी केली होती. ट्रायच्या या निर्णयाचा फायदा थेट जिओला होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या नेटवर्कवरुन एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोनवर मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग कॉल केले जातात. त्यामुळे जिओचा आता आययूसी खर्च कमी होणार आहे. आययूसीची सुरुवात 2003 साली करण्यात आली. इनकमिंग कॉल फ्री झाल्यानंतर ट्रायने कॉल करणाऱ्या ऑपरेटरकडून चार्ज वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला हा चार्ज 15 पैसे प्रती मिनिट ते 50 पैसे प्रती मिनिट होता. ट्रायने 2004 साली हा दर घटवून 20 पैसे प्रती मिनिट केला, तर 2015 मध्ये हा दर 14 पैसे प्रती मिनिट करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget