एक्स्प्लोर
वायरलेस पॉवर बँक लाँच, किंमत 2,999 रु.
पोर्टेबल डिजिटल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी टोरेटोने आता जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे.
मुंबई : पोर्टेबल डिजिटल प्रोडक्ट तयार करणारी कंपनी टोरेटोने आता जेस्ट प्रो वायरलेस चार्जर पॉवर बँक लाँच केली आहे. म्हणजे मोबाइल चार्जिंग करण्यासाठी आता वायरची गरज राहणार नाही. या पॉवर बँकमुळे यूजर्स आपला स्मार्टफोन वायरशिवाय चार्ज करु शकतील.
जेस्ट प्रो वायरलेस चार्जरमध्ये 10000 एमएएचचं लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. याच्या अल्ट्रापोर्टेबल लाईटवेट डिझाइनमुळे यूजर्स ही पॉवर बँक आपल्या लॅपटॉप बॅग किंवा अगदी आपल्या खिशातही ठेऊ शकतो.
स्लिक लूक असणारी ही पॉवर बँक फारच स्टायलिश आहे. टोरेटोने 10000 एमएएच बॅटरी, 2 यूएसबी आणि अल्ट्रा स्लीम डिझाईनसोबत ही नवी पॉवर बँक लाँच केली आहे. जेस्ट प्रो आणि जेस्ट अशा दोन पॉवर बँक असून यामध्ये रॉयल ब्लॅक आणि क्लासी व्हाईट अशा दोन रंगामध्ये या पॉवर बँक उपलब्ध आहेत. या दोन्ही पॉवर बँकची किंमत अनुक्रमे 2,999 आणि 2,099 आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement