Gaziabad: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये (Gaziabad) एलईडी टीव्हीचा ब्लास्ट झाल्यानं एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्या मुलाची आई आणि एक मित्र या ब्लास्टमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे आता गाझियाबादमधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एलईडी टीव्हीचा ब्लास्ट होण्याची कारणं काय आहेत? आणि टीव्ही वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? यबाबत जाणून घेऊयात...

Continues below advertisement


ओव्हरहिटींग
ओव्हरहिटींगमुळे टीव्हीचा ब्लास्ट होऊ शकतो. जर टीव्ही बऱ्याच वेळ सुरु असेल, तर टीव्हीचे काही पार्ट्समध्ये ओव्हरहिटींग होते. तसेच एकाच टीव्हीला तुम्ही अनेक डिवाईस कनेक्ट केले तरी देखील टीव्हीमध्ये ओव्हरहिटींग होते आणि टीव्हीचा स्फोट होऊ शकतो. 


पावर कमी-जास्त होणे 
घरात होणारा पावर सप्लाय हाय वॉल्टेजमध्ये झाला किंवा कमी झाला तरी देखील टीव्हीचा स्फोट होऊ शकतो. तसेच टीव्हीला कनेक्ट केलेली वायर खराब असेल आणि त्यातून अचानक जास्त पावर सप्लाय झाला तरी देखील टीव्हीचा ब्लास्ट होऊ शकतो. 


खराब  कॅपेसिटर
तुमच्या टीव्हीचा कॅपेसिटर खराब असेल तरी देखील टीव्हीचा ब्लास्ट होऊ शकतो. टीव्हीचा कॅपेसिटर हा टीव्हीपर्यंत योग्य वीजप्रवाह पोहोचवण्याचे काम करते. पण कॅपेसिटर खराब असेल तर हाय वॉल्टेज पावरमुळे टीव्हीचा ब्लास्ट होऊ शकतो.   


अशी घ्या काळजी
टीव्ही बऱ्याच वेळ सुरु ठेवू नका. टीव्ही पाहून झाल्यानंतर टीव्हीचा प्लग काढून ठेवा. टीव्हीचा कॅपेसिटर खराब झाला तर तो दुरुस्त करुन घ्या. पाऊस पडत असेल किंवा विजा चमकत असतील तर टीव्हीचा मेन स्विच बंद करा. टीव्हीला जास्त डिवाइज कनेक्ट करुन नका. टीव्हीला व्हिडीओ गेम, डिव्हीओ इत्यादी डिवाइज कनेक्ट करताना त्या डिवाइजची वायर कनेक्ट करताना चेक करा. ज्या रुममध्ये तुम्ही टीव्ही लावणार आहात, त्या रुममध्ये कोणतीही ज्वलनशील वस्तू नसावी. 


टीव्ही ज्या भिंतीवर तुम्ही लावणार आहात, त्याच्या जवळपास खिडकी किंवा एसी असावा. कारण बऱ्याच वेळ टीव्ही सुरु असेल तर हवेमुळे टीव्ही थंड होऊ शकतो. हवा जिथून येत असेल त्यानुसार तुम्ही टीव्ही भिंतीवर लावू शकता. तसेच पाऊस आणि सूर्यकिरण थेट टीव्हीवर पडेल अशा ठिकाणी टीव्ही लावू नका. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Gaziabad: गाझियाबादमध्ये एलईडी टीव्हीचा ब्लास्ट; 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, दोन जण जखमी