एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेल नव्हे, आता पूर्णपणे विजेवर चालणारी कार

दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली टेस्लाची ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट चालते.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या पारंपारिक इंधनाला असलेले पर्याय आता प्रत्यक्षात येताना दिसू लागले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात होऊ घातलेल्या या मोठ्या बदलाचे आणि त्यात होत असलेल्या संशोधनाचे परिणाम भारतासह जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. टेस्लाची ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालणारी आहे. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट चालते. सॉफ्टवेअरमध्ये आघाडीवर असलेल्या टेस्लाच्या याच कारने जागतिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची आणि परिणामानं जागतिक राजकारणाची सगळी गणितं बदलून टाकलीय. विजेवर चालणाऱ्या कार जगात बहुतांश देशांत तयार होतात. अगदी भारतातही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची e2o ( इटूओ) ही वीजेवरची गाडी आहे. पण या गाड्यांची ओळख मुख्यतः सिटी कार म्हणूनच राहिली. या गाड्यांचा वेग अत्यंत मर्यादितच आहे, आणि मुख्य म्हणजे चढावावर या गाड्या दम सोडतात. पण टेस्लाच्या या एस मॉडेलनं सगळ्या मर्यादा पार करून अमेरीकेच्या रस्त्यांवर सुसाट वेग घेतांना सगळ्याच प्रतिस्पर्ध्यांना कित्येक किलोमिटर मागे टाकलं. शेव्हरोले, स्कोडा, वॉक्सवॅगन या दुसऱ्या कंपन्यांनी आता कंबर कसलीय. टेस्लाच्या धसक्यानं म्हणा की संशोधन अंतिम टप्प्यात आल्यानं म्हणा, शेव्हरोलेनं भारतातली आपली गाड्यांची विक्री पूर्णतः बंद केलीय. स्कोडा आणि वोक्सवॅगनही त्याच मार्गावर आहेत. अर्थात भारतात उत्पादन बंद झालेलं नाही, पण तयार होणाऱ्या गाड्या मुख्यतः लॅटीन अमेरीकन आणि अफ्रीकी देशांमध्ये निर्यात होणार असल्यानं निदान पुढची काही वर्ष तरी ते सुरूच रहाणार आहे. टेस्लानं त्यांची ही बहुचर्चित एस मॉडेल विकण्यासाठी भारतातही सुपर डिस्ट्रीब्युटरची नेमणूकही केली आहे. जागतिक राजकारणाची समिकरणंही या एका कारनं बदलली आहेत. फ्रान्सचे तरूण राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पुढच्या दशकभरात फ्रान्समध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलाचं अर्थकारण आता फार काळ चालणार नाही याची पहिल्यांदा जाणीव झाली ती दुबई म्हणजे युएई आणि सौदी अरेबिया या दोन देशांना. दुबईनं तेलाचं राजकारण सोडून जागतिक बाजापेठेचं आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा केंद्रबिंदू बनण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केलीय. सौदी अरेबियांनंही देशातले कायदे सैल करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र बेटं विकसित करण्याचा निर्णय घेतलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
Madhuri Dixit Mimics Namrata Sambherao Lolly: 'मेरी आँखों में झाँको!', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीची धकधक गर्लला भूरळ; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर माधुरी दीक्षितनं केली हुबेहुब नक्कल
'मेरी आँखों में झाँको!', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या लॉलीची धकधक गर्लला भूरळ; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हुबेहुब नक्कल
Nagpur MLC Election 2026: नागपुरातील बंडखोरी शमवण्यात यश, पण अनिल सोलेंच्या मतपत्रिकेवरील नावाचा भाजपला फटका बसणार? काँग्रेसच्या अभिजीत वंजारींकडून दणदणीत विजयाचा दावा, म्हणाले..
नागपुरातील बंडखोरी शमवण्यात यश, पण अनिल सोलेंच्या मतपत्रिकेवरील नावाचा भाजपला फटका बसणार? काँग्रेसच्या अभिजीत वंजारींकडून दणदणीत विजयाचा दावा, म्हणाले..
Embed widget