एक्स्प्लोर
सोनीकडून भारतात आता फक्त प्रिमियम xperia स्मार्टफोनचीच विक्री

मुंबई: इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नामांकित कंपनी सोनी देशात नवे बदल करण्याच्या तयारीत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सोनी कंपनी आता भारतात प्रिमियम xperia स्मार्टफोनचीच विक्री सुरु ठेवणार आहे.
सोनी इंडियाचे xperia बिझनेस प्रमुख विजय सिंह जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी मोबाईल चालू अर्थिक वर्षात काही ठराविक स्मार्टफोनज बाजारात विक्रीसाठी ठेवणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत फक्त प्रिमियम स्मार्टफोनचीच विक्री सुरु ठेवणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील त्रैमासिक अहवालानुसार, भारतामध्ये प्रिमियम उत्पादनांची विक्री 55 % नी वाढली आहे.
मात्र, गेल्या काही दिवासांपूर्वी भारतात प्रिमियम उत्पादनाच्या विक्रीवरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे वृत्त होते. भारत, इंडोनेशिया, चीन आणि ब्राझील आदी देशांच्या बाजारपेठांमध्ये विक्रीमध्ये 0.3% घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून कंपनी आपली उत्पादनांच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशिल आहे.
सोनीच्या Xperia Z सिरीजमधील Xperia Z5 हा शेवटचा स्मार्टफोन असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. कारण कंपनी आता नवीन X सिरिज लाँत करण्याच्या तयारीत आहे.
त्यामुळे कंपनीची Xperia M आणि E सिरीज देशात लाँच होण्याची शक्यता धुसर दिसत आहे. आयडीसीच्या आहवालानुसार, सोनीवर स्मार्टफोनच्या क्षेत्रातील स्वत: चे अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
