एक्स्प्लोर
जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक लूक! Smartron चा पहिला लॅपटॉप लॉन्च

मुंबई : Smartron या भारतीय स्टार्टअप कंपनीने बाजारात t.book नावाचा लॅपटॉप लॉन्च केला आहे. याच लॅपटॉप प्रकारातील हायब्रिड कम्प्युटर बाजारात सध्या उपलब्ध आहेत, मात्र Smartron च्या लॅपटॉप एवढ्या कमी किंमतीत नाहीत. लॅपटॉप आणि टॅब्लेट या दोन्हींची गरज याच लॅपटॉपमधून पूर्ण होऊ शकते.
विंडोंज 10 वर चालणारा t.book लॅपटॉप दिसायला अत्यंत आकर्षक असून, Smartron कंपनीचा हा लॅपटॉप स्पेसिफिकेशन्सच्या दृष्टीनेही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
Smartron च्या नव्या t.book लॅपटॉपचे फीचर्स :
लॅपटॉपमध्ये यूएसबीसाठी USB 3.0 चे तीन स्लॉट्स देण्यात आले असून, चार्जिंग पॉईंट, मायक्रो-एचडीएमआय पोर्ट, हेडफोन जॅकसोबत लॅपटॉपमध्ये मायक्रोएसडी कार्डसाठी स्लॉटही देण्यात आले आहेत. Smartron कंपनीचा t.book हा लॅपटॉप 39 हजार 999 रुपये किंमतीचा आहे.

- 2 इंच WQXGA आयपीएस स्क्रीन (2560×1600 पिक्सेल रिझॉल्युशन)
- Intel चा Core M प्रोसेसर
- मल्टिटास्किंगसाठी 4 जीबी LPDDR3 रॅम
- 128 जीबी स्टोरेज
- 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
